कोल्हापूर

किटक अन्‌ निसर्ग; किटकांचा खाद्यउद्योगातील वापर

CD

43013
41404, 41405, 41418, 41419


काही उपयुक्त, काही उपद्रवी ः दोन हजारपेक्षा जास्त प्रजाती खाण्यायोग्य

कीटकांचे अद्‌भूत जग

ीलिड
कीटकांचे स्थान अन्नसाखळीत अतिमहत्त्वाचं आहे; कारण कीटक पर्यावरणाचा ऱ्हास थांबवतात. याबरोबर पिकांवरील त्रासदायक किडींचं नियंत्रणही करतात. परागीभवन करतात. परागीभवनामुळे बी-बियाण्यांची निर्मिती होते. जगात कीटकांची संख्या अफाट आहे. कीटकांवर जगभरात अजूनही संशोधन सुरू आहे. शिवाजी विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागातही कीटकांच्या विविध प्रजातींचा शोध सुरू आहे. अशा या कीटकांचं अद्‌भुत जग जाणून घेऊ...

- अमोल सावंत
...

कीटक आहे म्हणून, अन्यथा...
हवामान, वातावरण कसलंही असू दे, तिथे तगून राहण्याची असाधारण क्षमता कीटकांत असते. म्हणून डेव्होयिनम कल्पाच्या आधीपासून पृथ्वीवर कीटकांची निर्मिती झाली. तेव्हा पृथ्वीवर डायनोसॉरही नव्हते. कीटक वनस्पतींची पाने, रस, फुले, फळे, मुळे, आळी, अन्य किडी, मातीतील ह्युमस, सूक्ष्मजीव आदींवर जगतात. पुनरुत्पादन क्षमता तर अफाट असते. विषुववृत्तीय प्रदेशात कीटकांची संख्या जास्त आढळते, त्या तुलनेने थंड प्रदेशात प्रमाण कमी असते. उष्ण कटिबंधात संख्या जास्त दिसते. कोल्हापूर जिल्हा, पश्‍चिम घाट उष्ण कटिबंधात येतो. पश्‍चिम घाटात कीटकांची संख्या नेमकी किती याचं संशोधन सुरू आहे.


्अचाट प्रवास
नाकतोड्याचा विचार केला तर ते विविध देशांमधून अन्य भागांतून येतात. अन्य प्रवासी कीटकही येतात. ते स्थानिक कीटकांबरोबर हवामान, वातावरण बदल, उपलब्ध अन्न असेपर्यंत थांबतात. योग्य कालावधीत स्थलांतर करत अन्य भागांत जातात. कीटक एकमेव अपृष्ठवंशीय प्राणी आहे, जो उडू शकतो. मधमाशीचा विचार केला तर ती एका दिवसात एक हजार फुलांना भेट देऊन मकरंद गोळा करते. तिच्या भेटीमुळे परागीभवनाला गती येऊन बीजनिर्मितीला चालना मिळते. नुसती मधमाशीच नाही, तर भुंगे, अन्य कीटकही परागीभवनाकरिता मदत करतात.

उपयुक्त कीटकांचं महत्त्व
डॉ. गायकवाड म्हणाले, ‘‘कीटकांत उपयुक्त अन्‌ त्रासदायकही असताता. उपयुक्त कीटकांत रेशीम कीटक, मधमाशी असे काही कीटक आहेत. हे उपयुक्त कीटक पिकांवरील किडीचा फडशा पाडते. कीटक शास्त्रज्ञांनी कीटकांचे ३२ गट केले असून आतापर्यंत १.५ दशलक्ष प्रजातींचा अभ्यास झाला आहे. डॉ. अल्बर्ट आईन्स्टाईन म्हणतात त्याप्रमाणे ‘पृथ्वीवरील शेवटची मधमाशी जेव्हा नाहीशी होईल, तेव्हापासून पुढील चार वर्षे फक्त मानव पृथ्वीवर टिकेल.’’ शिवाजी विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागात डॉ. गायकवाड यांनी गांधील माशी, चतुर कीटक, प्रार्थना कीटक, रस शोषणाणी/ढेकूणवर्गीय पेंटाटोमीड बग (कीटक), लेडी बर्ड बीटल, लॉंग हॉर्न बीटलवर संशोधन केले आहे. सध्या प्राणीशास्त्र विभागात फळे/पालेभाज्यांवरील कीटकांवर संशोधन सुरू आहे.

नैसर्गिक अधिवासात हस्तक्षेप
पश्‍चिम घाटात वृक्षतोड, खणीकाम सुरू आहे. मानवाचा नैसर्गिक अधिवासात हस्तक्षेप वाढला असून जेव्हा एखादा कीटक नामशेष होतो, तेव्हा अन्नसाखळीतील एक दुवा नष्ट होतो. अन्नसाखळी तुटू लागते. या कीटकांवरील अवलंबून असलेल्या अन्य घटकही विलुप्त होऊ लागतो. एक कीड नष्ट करण्यासाठी जेव्हा कीडकनाशक फवारले जाते, तेव्हा उपयुक्त कीटकही मृत होतो.


चौकट
खाद्य उद्योगात वापर
जगभरातील अनेक प्रयोगशाळांनी अन्नाची मागणी पूर्ण करण्यासाठी कीटकांच्या वापरावर लक्ष केंद्रित केलं आहे; कारण कीटकांत प्रथिनांचं प्रमाण खूप असते. दोन अब्जांहून अधिक लोक कीटकांशी संबंधित पीठ, हॅम्बर्गर पॅटीस, कीटक पावडर असलेली प्रथिने बार, पास्ता, ब्रेड, कीटकांच्या पीठाने भाजलेली ब्रेड, कुरकुरीत कीटक स्नॅक्स, बीअर, दूध, कीटक आइस्क्रीम खातात. दोन हजारपेक्षा जास्त कीटकांच्या प्रजाती खाण्यायोग्य मानल्या जातात.
...................

इन्फो बॉक्स
ीकीटकांची उत्पत्ती : ४०० दशलक्ष वर्षांपूर्वी डेव्होयिनम कालखंडात
आतापर्यंतच्या प्रजातींचा अभ्यास : १.५ दशलक्ष कीटक
प्राण्यांच्या प्रमाणात कीटक : ७५ टक्के
जगातील कीटक प्रजाती : १० दशलक्ष
भारतात कीटक प्रजाती : ६० हजार
महाराष्ट्रातील प्रजाती : दोन हजार
कोल्हापूर जिल्ह्यात प्रजाती : अगणित
पश्‍चिम घाटातील प्रजाती : अगणित
...

कोटस्‌
‘‘कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर दर हंगामात कीटकांची संख्या बदलते. अनुकूल परिस्थितीत ते अंडी किंवा कोषावस्थेत राहतात. कीटकांचा शोध घेणं क्लिष्ट काम आहे. अनेक विद्यार्थी आज कीटकांवर संशोधन करत आहेत.’’
-डॉ. एस. एम. गायकवाड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayush Komkar Case: आयुष कोमकर खून प्रकरणात कोर्टामध्ये काय घडलं? बंडू आंदेकरचे पोलिसांवरच आरोप

Pune Traffic Issue : वाहतूक अडथळ्यांच्या कारणांचा अहवाल सादर करा; आयुक्तांचा आदेश

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

Latest Maharashtra News Updates : प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची छेडखानी, तक्रार करुनही कारवाई नाही

SCROLL FOR NEXT