कोल्हापूर

आशा, गट प्रवर्तकांतर्फे सोमवारी रास्ता रोको

CD

आशा, गटप्रवर्तकांचा संप सुरूच

सोमवारी रास्ता रोको आंदोलन : बोनस, माधनवाढीसह समायोजनाची मागणी

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ : जोपर्यंत गटप्रवर्तकांचे समायोजन होत नाही, तोपर्यंत आशा आणि गटप्रवर्तकांचा संप सुरूच राहील, असा इशारा जिल्हा आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक युनियनतर्फे भरमा कांबळे, चंद्रकांत यादव यांनी पत्रकार परिषदेत दिला.

ऑनलाईन कामाची सक्ती करू नये, या दिवाळीत बोनस पाच हजार रुपये मिळावा, गटप्रवर्तकांच्या मानधनात वाढ करावी, या मागण्यांसाठी संप सुरूच राहील. तसेच सोमवारी (ता. ६) रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता दसरा चौकातून गोकुळ हॉटेलपर्यंत मोर्चा होईल. नंतर स्टेशन रोडवर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

संघटनेच्या खजिनदार संगीता पाटील म्हणाल्या, ‘राज्य सरकार मानधनवाढीत कमी-जास्त प्रमाण करून आशा आणि गटप्रवर्तकांत दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र आम्ही एकच आहोत. आमच्या मागण्यांची पूर्तता होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवू. आंदोलनाची तीव्रता वाढविली जाईल.’

कांबळे म्हणाले, ‘आशा आणि गटप्रवर्तकांच्या अनेक मागण्यांकरीता १८ ऑक्टोबरपासून राज्यव्यापी संप सुरू आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी बुधवारी (ता. १) आशा कर्मचाऱ्यांना सात हजार तर गटप्रवर्तकांना ६२०० रुपये मानधनवाढ जाहीर केली. दिवाळी बोनस प्रत्येकी दोन हजारांची घोषणा केली, मात्र राज्य शासनाचे हे निर्णय कृती समितीला मान्य नाहीत. गटप्रवर्तकांना मानधन कमीच्या घोषणेमुळे गट प्रवर्तकांत नाराजी आहे. अद्यापही आशा कर्मचाऱ्यांची ऑनलाईन सक्ती मागे घेतलेली नाही. मानधनवाढीची घोषणा केली, पण ४८ तास लोटले तरी अद्याप तसा जी.आर. काढलेला नाही. ज्या मागण्यांसाठी संप सुरू आहे, त्या मागण्या मान्य झाल्याशिवाय संप मागे घेणार नाही.’
यावेळी सारिका पाटील, विमल अतिग्रे, हेमा कांबळे, सुरेखा तिसंगीकर, मनीषा मोरे कविता पाटील, छाया काळे, विद्या जाधव, वसुधा बुडके उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT