लोगो - चितळे
48103
कोल्हापूर : सकाळ माध्यम समूहातर्फे झालेल्या ‘चला, किल्ला बांधूया’ स्पर्धेतील विजेत्यांना बुधवारी पारितोषिक वितरण झाले. या वेळी सकाळ माध्यम समूहाच्या संचालक जान्हवी पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, संपादक निखिल पंडितराव, डॉ. अमर अडके, प्राचार्य डॉ. महादेव नरके आदी उपस्थित होते. (बी. डी. चेचर : सकाळ छायाचित्रसेवा)
‘सकाळ’च्या किल्ला स्पर्धेत ‘विजेता’, ‘शिवतेज’ प्रथम
पारितोषिक वितरण; ‘हिंदवी’; ‘अचानक’, ‘राजे संभाजी’, अभिषेक रेसिडेन्सीला विभागून दुसरा क्रमांक
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २९ : सकाळ माध्यम समूहातर्फे यंदाच्या दिवाळीत झालेल्या ‘चला, किल्ला बांधूया’ स्पर्धेत कसबा बावडा येथील विजेता तरुण मंडळ आणि कदमवाडीच्या शिवतेज मित्र मंडळाला विभागून पहिला क्रमांक देण्यात आला. विजेता तरुण मंडळाने कुंजरगड व कांचन मांचन आणि शिवतेज मंडळाने तळागडची प्रतिकृती साकारली होती. चितळे उद्योग समूह स्पर्धेचे प्रायोजक, तर रोटरी क्लबचे विशेष सहकार्य मिळाले.
विजेत्या मंडळांना सकाळ माध्यम समूहाच्या संचालक जान्हवी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिके देण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आणि त्यांनी उभारलेले किल्ले आजही आपल्याला प्रेरणा देतात. शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन कौशल्य हा विषय मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना शिकवला जातो. एकूणच नव्या पिढीला शिवचरित्र अधिक बारकाईने अभ्यासण्यासाठी ‘चला, किल्ला बांधूया’ यासारखे उपक्रम उपयुक्त ठरतात.’’
प्रसिद्ध दुर्गअभ्यासक डॉ. अमर अडके म्हणाले, ‘‘स्पर्धेत सहभागी सर्व मंडळांच्या कार्यकर्त्यांनी अगोदर प्रत्यक्ष किल्ला पाहिला आणि नंतर कोल्हापुरात येऊन त्याच्या प्रतिकृती साकारल्या आहेत. अशा उपक्रमांसाठी ‘सकाळ’ने नेहमीच पुढाकार घेतला असून, येत्या काळात हा उपक्रम आणखी व्यापक होईल.’’
‘सकाळ’चे संपादक निखिल पंडितराव म्हणाले, ‘‘स्पर्धेला मिळणारा प्रतिसाद पाहता आता किल्ले तयार करण्यापूर्वी कार्यशाळा घेतली जाते. त्यामुळे चौफेर अभ्यास करूनच किल्ले साकारले जात आहेत. ‘सकाळ’ अशा उपक्रमांसाठी नेहमीच सर्वात पुढे असेल.’’
रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलचे प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी ‘सकाळ’च्या उपक्रमात ‘रोटरी’चा सहभाग नेहमीच असेल, अशी ग्वाही दिली. या वेळी रोटरी-सेंट्रलचे संजय भगत, उदय कुलकर्णी आदी उपस्थित होते. दरम्यान, डॉ. अडके, उदय कुलकर्णी, दशरथ गोडसे, विक्रम पाटील यांनी किल्ल्यांचे परीक्षण केले.
--------------
चौकट
स्पर्धेचा सविस्तर निकाल असा...
- दुसरा क्रमांक (विभागून) ः हिंदवी ग्रुप, विचारेमाळ (वेल्लोर), अचानक तरुण मंडळ, संभाजीनगर (रायगड), राजे संभाजी तरुण मंडळ, शिवाजी पेठ (प्रतापगड), अभिषेक रेसिडेन्सी मित्र मंडळ, कसबा बावडा (सिंहगड).
- तिसरा क्रमांक (विभागून) ः साठमारी फ्रेंडस् सर्कल, मंगळवार पेठ (रायगड), महाकाली तालीम भजनी मंडळ, शिवाजी पेठ (तळागड), दत्त प्रसन्न ग्रुप, शिवाजी पेठ (लोहगड), देखो ग्रुप, मंगळवार पेठ (शिवनेरी)
- उत्तजनार्थ ः बाल नेताजी ग्रुप, शिवाजी पेठ (राजहंसगड), संध्यामठ तरुण मंडळ, शिवाजी पेठ (सिंधुदुर्ग), छत्रपती वीर संभाजी तरुण मंडळ, भोसलेवाडी (विशाळगड)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.