कोल्हापूर

सीसीटीव्हीने शोधला घरचा चोर

CD

56191
...
नोकरानेच चोरले सात लाखांचे दागिने

मालकाने सीसीटीव्ही लावून पकडला चोर : पोलिसांनी जप्त केले ४ लाख ७९ हजारांचे दागिने

सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. ६ ः हॉटेल व्यावसायिकाच्या बेडरूममधील तिजोरीतून एक एक दागिना चोरीस जात होता. त्यांना शंका आली आणि त्यांनी कोणालाही माहिती न देता खोलीत सीसीटीव्ही लावला. काही दिवसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिले तेव्हा घरी असलेला नोकरच डुप्लीकेट चावीने दागिने चोरत असल्याचे दिसून आले. त्यांनी याची फिर्याद दिली आणि शाहूपुरी पोलिसांनी नोकराला अटक केली. शुभम ऊर्फ साहिल मनोज कांबळे (वय २४, रा. दत्त गल्ली, कसबा बावडा, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजय सिंदकर यांनी आज पत्रकार परिषदेत या चोरीबाबतची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, फिर्यादी मधुकर बापू वाघमारे यांचा ताराबाई पार्क येथील हिम्मत बहाद्दूर एनक्लेव्हमध्ये ५०१ विंगमध्ये दोन मजली बंगला आहे. त्यांच्या घरी नोकरचाकर आहेत. त्यांच्या बेडरूममधील सुमारे साडेसात लाखांचे दागिने टप्प्याटप्प्याने चोरीस गेले. याबाबत त्यांना शंका आली होती. त्यामुळे त्यांनी चोर पकडण्यासाठी त्यांच्या बेडरूममध्ये सीटीटीव्ही लावले. याची माहिती कोणालाही दिली नाही. त्यामध्ये त्यांच्याच घरी गेली पाच वर्षे काम करणारा नोकर शुभम कांबळे याने त्यांच्या तिजोरीतील दागिने चोरल्याचे फुटेजमध्ये दिसून आले. साधारण ऑगस्ट ते डिसेंबरदरम्यान कांबळेने ही चोरी केली आहे. डिसेंबरमध्ये लावलेल्या सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये तो चोरी करीत असल्याचे दिसून आले आहे. त्याला अटक केली असून, त्याच्याकडून सुमारे चार लाख ७९ हजार रुपयांचे दागिने जप्त केले आहेत.
सहाय्यक पोलिस निरीक्षक शीतलकुमार वेल्हाळ, सहाय्यक फौजदार संदीप जाधव, मिलिंद बांगर, विकास चौगुले, शुभम संकपाळ, लखन पाटील, बाबासाहेब ढाकणे, रवी अंबेकर, महेश पाटील यांनी अधिक तपास केला.
...
आईच्या वाटणीचे दागिने
चोरलेल्या दागिन्यांपैकी काही दागिने कांबळे याने कसबा बावड्यातील ओंकार पाटील या सराफाकडे नेले. तेथे आमच्या आईच्या माहेरच्या वाटणीतील दागिने मिळाले असल्याचे सांगितले. त्यांच्याकडून त्या दागिन्यांचे आईला मंगळसूत्र केल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. चोरलेले दागिने त्याने स्वतःच्याच घरी स्वतःच्या लॉकरमध्ये ठेवले होते. पोलिसांनी त्याला अटक करून घरझडतीत ते जप्त केल्याची माहिती निरीक्षक सिंदकर यांनी दिली.
...
आई रडू लागली...
चोरटा संशयित शुभम याचे शिक्षण इयत्ता दहावीपर्यंत झाले आहे. त्याला अटक करून शाहूपुरी पोलिस ठाण्यात आणल्यावर याची माहिती पोलिसांनी पत्रकारांना दिली. त्यावेळी त्याची आई पोलिस ठाण्याच्या आवारातच थांबून होती. मुलग्याला पोलिसांच्या ताब्यात पाहून तिला रडू आले. ‘माझा मुलगा असा नव्हता...’ म्हणून ती रडू लागली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Election : भाजपविरोधी मतांचे ध्रुवीकरण टाळण्यासाठी महाविकास आघाडीची मोठी खेळी

Latest Marathi News Live Update : पुण्यात काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेची युती

Paradh News : दोन बांगलादेशीची स्वदेशात रवानगी; पोलिस ठाण्यात झाला होता गुन्हा नोंद

वैताग आलाय, लोक विचारतायत, बायको विचारतेय...; भाजपच्या निष्ठावंताला अश्रू अनावर, उमेदवारी नाकारल्यास आत्मदहनाचा इशारा

Winter Pregnancy Care: हिवाळ्यात गर्भातलं बाळही थंडी अनुभवतं! आई आणि बाळ सुरक्षित ठेवण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

SCROLL FOR NEXT