कोल्हापूर

त्या अर्भकाला मिळाली मायेची ऊब

CD

‘त्या’ नवजात बालकाला
सीपीआरने दिली मायेची ऊब

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ ः कसबा बावडा येथे ३१ डिसेंबरला कचऱ्यात टाकलेल्या ‘त्या’ नवजात बालकाला सीपीआरने नवसंजीवनी दिली. येथील डॉक्टर व परिचारिकांमुळे मायेची ऊब मिळाली. कडाक्याच्या थंडीत कचऱ्यात पडलेल्या नवजात बालकाला मातापित्यांकडून प्रेमाचा स्पर्श मिळाला नसला तरी जन्मानंतर काही तासाने का असेना तिला आपुलकीच्या माणसांकडून प्रेमाचा स्पर्श मिळाला. त्यांच्याच उपचारामुळे ती ठणठणीत बरी होऊन बालकल्याण संकुल या नव्या घरी गेली आहे.
वर्षाच्या शेवटच्या दिवशी कसबा बावडा येथील एका सफाई कर्मचाऱ्याला स्त्री जातीचे अर्भक आढळून आले. या बाळाला उपचारासाठी तत्काळ सेवा रूग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांच्या सल्ल्याने सकाळी साडेदहाच्या सुमारास सीपीआरमध्ये हलविण्यात आले. तिचे वजन कमी, त्यातही गारठ्यात राहिल्याने शरीर गार पडले होते. मुंग्या चावल्याने मानेवर, उजव्या बाजूला जखमा झाल्या होत्या. वैद्यकिय अधिक्षक डॉ. शिशीर मिरगुंडे, विभागप्रमुख प्रा. डॉ. सुधीर सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. ईश्वरी जाधव, डॉ. प्रतिमा पाटील, डॉ. अर्पिता कोठारी, डॉ. अक्षय माळी, परिचारिका सिंधू पाटील व नलिनी पाटील यांच्या प्रयत्नांतून तिचा जीव वाचला आणि जणू पुर्नजन्मच मिळाला. तिला धनुर्वातची लस दिली. जंतुसंसर्ग होऊ नये यासाठी आवश्यक उपचार केले. तिच्यावर फक्त उपचार करूनच हे डॉक्टर थांबले नाहीत तर तिला आईचे दुध मिळावे, यासाठी सीपीआरमधील नुकतीच प्रसुती झालेल्या मातांनीही तिच्यासाठी मिल्क बँकेच्या माध्यमातून दुध दिले. अर्थातच नुकतीच जन्मलेली ‘ती’ जीवनमरणाच्या दारात असताना प्रेमाच्या स्पर्शाला, आईच्या दुधासाठी आसुसली होती. सीपीआरने तिला मायेची ऊब तर दिलीच शिवाय आईच्या दुधाची चवही चाखवली.
...
‘सध्या या बाळाची प्रकृती ठणठणीत आहे. बाळाचे वजनही दीड किलोपेक्षाही वाढले आहे. मुलांच्या ज्या तपासण्या जन्मतःच कराव्या लागतात, त्या सर्व चाचण्या सीपीआर प्रशासनाने केल्या. या सर्व चाचण्यांचे अहवाल सकारात्मक आले. तिच्या उपचाराची जबाबदारीही सीपीआर प्रशासन तितक्याच आत्मीयतेने करेल.
- डॉ. शिशीर मिरगुंडे, वैद्यकिय अधिक्षक, सीपीआर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyber Fraud Alert: सायबर फसवणुकीचा नवा प्रकार; काय आहे 401# कोड आणि त्याचे धोके, जाणून घ्या आणि आताच सावध व्हा!

Python Enters House Video: भयानक! मोबाइल बघत बसली होती मुलं, तितक्यात घरात शिरला महाकाय अजगर अन् मग...

Latest Marathi News Updates: शिवसेना नेत्या शायना एनसी यांनी उज्ज्वल निकम यांचे केले अभिनंदन

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

Viral Video : प्रियकरासोबत वारंवार फरार व्हायची पत्नी; घटस्फोट होताच पतीने दुधाने आंघोळ करत जल्लोष साजरा केला अन्...

SCROLL FOR NEXT