कोल्हापूर

-

CD

भरधाव मोटार आली अन चिखलात रूतली
खांडसरीनजीक अपघात ः सुदैवाने खड्डयात कोसळताना वाचली

शिंगणापूर, ता.६ : रस्ता अरूंद, वेळ रात्री पावणेनऊची, शिंगणापूर रोडवरून भरधाव वेगाने मोटार आली ती थेट खांडसरी नाक्याजवळील गळती काढण्यासाठी काढलेल्या भल्या मोठ्या खड्ड्याशेजारील चिखलात रूतली. सुदैवाने, पुढील अनर्थ टळला. खड्ड्यात कोसळली असती तर मोठा अपघात घडला असता. त्या अलिशान मोटारीत असलेल्या चौघाही तरूणांना भान नसल्याने हा अपघात घडला. अपघाताची माहीती मिळताच मोटारचालकाच्या संबधितांनी घटनास्थळी धाव घेतली व नागरिकांच्या मदतीने मोटार रात्री उशीरा बाहेर काढली.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, शिंगणापूर रोडवरून कोल्हापूरच्या दिशेने भरधाव वेगाने एक अलिशान मोटार भरधाव वेगाने आली. या मोटारीचा वेग व त्या मार्गावरील वाहतुकीच्या गर्दीमुळे अनेकांच्या काळजाचा ठेका चुकला. या मोटारीतील तरुणांना स्वतःचे भान नव्हेतच. या मोटारीच्या वेगामुळे कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून अनेकांना आपली वाहने स्वतःच रस्त्याकडेला थांबवल्या.
याच दरम्यान, शिंगणापूर फाट्यावर खांडसरीनजीक शहर पाणी योजनेच्या कामासाठी रस्त्यात भला मोठा खड्डा खणला आहे. गेले पंधरा दिवस येथे दुरूस्तीचे काम सुरू आहे. भरधाव वेगाने आलेली मोटार व समोर खड्डा दिसताच चालकाचे नियंत्रण सुटले, ती खड्ड्याशेजारील चिखलात अडकली अन् पुढील अनर्थ टळला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्वत:च्या आमदारांचा विरोध तरी ठाकरे बंधूच्या युतीनंतर पेढे वाटणाऱ्यांचा भाजप प्रवेश, मंत्री महाजनांसमोर राडा

Kolhapur Crime: गुलाल, भात, अन् टाचण्या टोचलेले लिंबू... कोल्हापुरात गाभण गायीचा दुर्दैवी मृत्यू; ग्रामस्थांमध्ये दहशत

Shivaji Maharaj Video: इतिहास जिवंत झाला! शिवराज्याभिषेकापासून रायगडच्या 3D मॅपिंगपर्यंत… 2025 मध्ये AI ने घडवलेले शिवरायांचे थरारक क्षण

Christmas Viral Video: ख्रिसमसची खास सुरुवात, मुंबई चर्चचा व्हिडिओ पाहिलात का?

लैंगिक संबंध करताना सापडले! प्रियकराच्या मदतीनं पत्नीनं पतीचा केला निर्घृण खून; मृतदेह ग्राइंडरने कापून फेकला नाल्यात

SCROLL FOR NEXT