Kolhapur Airport esakal
कोल्हापूर

Kolhapur Airport : कोल्हापूर विमानतळासाठी 28 कोटी 42 लाखांचा निधी; अतिरिक्त भूसंपादनाला मिळणार गती

राज्यातील विमानतळांच्या विकासासाठी २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी तीनशे कोटींची तरतूद अर्थसंकल्पीत केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरणासाठी आणखी ६४ एकर इतक्या अतिरिक्त भू-संपादन केले जाणार आहे.

कोल्हापूर : राज्यातील पाच विमानतळांच्या (Kolhapur Airport) विकासासाठी शासनाच्या वित्त विभागाने २१० कोटी रुपये निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीच्या माध्यमातून महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीस (Maharashtra Airport Development Company) वितरित केला आहे. त्यापैकी कोल्हापूर विमानतळासाठी २८ कोटी ४२ लाख रुपये वितरित झाला आहे. या निधी आता येथील अतिरिक्त भूसंपादनाच्या प्रक्रियेला गती मिळणार आहे.

या निधी वितरणाबाबतचा शासन आदेश आज सामान्य प्रशासन विभागाने काढला आहे. राज्यातील विमानतळांच्या विकासासाठी २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी तीनशे कोटींची तरतूद अर्थसंकल्पीत केली आहे. वित्त विभागाने मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीमधून २१० कोटी इतका निधी वितरित केला आहे. कोल्हापूर विमानतळ विकासासाठी यापूर्वी शासनाने २१२ कोटी २५ लाख रुपयांचा मंजूर केला आहे.

त्यातील २८ कोटी ४२ लाख रुपयांचा अखेरचा टप्पा आज वितरित करण्यात आला असल्याचे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे अपर जिल्हाधिकारी दीपक नलवडे यांनी सांगितले. दरम्यान, कोल्हापूर विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरणासाठी आणखी ६४ एकर इतक्या अतिरिक्त भू-संपादन केले जाणार आहे. त्यापैकी २१ एकरची प्रक्रिया पूर्ण झाली असून उर्वरित भू-संपादनाची अंतिम टप्प्यात आली आहे.

३१ मार्चपूर्वी निधी खर्चाची सूचना

ज्या विकासकामांसाठी निधी वितरित केला आहे. त्याच कामांसाठी तो ३१ मार्चपूर्वी खर्ची पडेल याची खबरदारी विमानतळ विकास कंपनीने घ्यावी, अशी सूचना शासनाने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live: दे दणादण! वैभव सूर्यवंशीने पंजाबच्या गोलंदाजांचा केला पालापाचोळा; ८ चेंडूंत ४२ धावा, IPL 2026 मध्ये रचला इतिहास

Pune News : १०० दिवसात नागरी हितापेक्षा भ्रष्टाचाराला प्राधान्य; सत्ताधारी भाजपवर काँग्रेसची टीका

यवतमाळ हादरलं! अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा झोपेतच गेम; छतावर चढून कुर्‍हाडीने सपासप वार

विधान परिषदेसाठी भाजपकडून ६ उमेदवारांची घोषणा, कुणाला मिळाली संधी? वाचा यादी...

Harihar Panchamasali Math Controversy : पंचमसाली मठात हायव्होल्टेज ड्रामा! वचनानंद स्वामी आणि ट्रस्टींमध्ये जुंपली; कोट्यवधींच्या हिशेबावरून तीव्र वाद

SCROLL FOR NEXT