ST Corporation
ST Corporation esakal
कोल्हापूर

ST Corporation : 'एसटी'ची स्वच्छतागृहे अचानक तपासणार; CM शिंदेंच्‍या सूचनेनंतर महामंडळाला आली खडबडून जाग

शिवाजी यादव

राज्यातील २५० वर बसस्थानकांवरील आगार व्यवस्थापकांना स्वच्छतागृहे टापटीप राहावीत यासाठी कटाक्षाने लक्ष द्यावे, असे आदेश काढले आहेत.

कोल्हापूर : एसटी महामंडळाच्या (ST Corporation) राज्यभरातील बसस्थानकावरील स्वच्‍छतागृहाच्या गलिच्छपणामुळे प्रवाशांना मन:स्ताप सोसाव लागतो आहे. याची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी स्वच्छतागृहांची अवस्था सुधारा, अशा सूचना केल्या. त्याचाच एक भाग म्हणून राज्यभरातील स्वच्छतागृहांची अचानक तपासणी होणार आहे. तसेच स्वच्छतागृह कायमस्वरूपी स्वच्छ राहावीत यासाठी एसटी आगारप्रमुखांवर जबाबदारी निश्चित केली आहे.

राज्यातील एसटी बसस्थानकांवर (ST Bus Stand) खासगी संस्थांना स्वच्छतागृह चालविण्याचा ठेका दिला आहे. काही वर्षांत स्वच्‍छतागृहातील गैरसोयी, पाण्याचा अभाव, विजेचा लंपडाव, दुर्गंधी, डासांचा उपद्रव दिसून येत आहे. याबाबत प्रवासी व एसटी कर्मचाऱ्यांनी तक्रार करूनही बदल झालेले नव्हते. परिणामी, या तक्रारी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचल्या. त्यांनी सूचना दिल्यानंतर एसटी महामंडळ प्रशासन खडबडून जागे झाले.

त्यानुसार राज्यातील २५० वर बसस्थानकांवरील आगार व्यवस्थापकांना स्वच्छतागृहे टापटीप राहावीत यासाठी कटाक्षाने लक्ष द्यावे, असे आदेश काढले आहेत. तसेच अचानकपणे स्वच्छतागृहांची पाहणी करण्याचे अधिकार दिले आहेत.

स्वच्छतागृहातील नळ पाणीपुरवठा, दरवाजा, खिडक्या, भांडी, कडीकोयंडा, पाण्याची टाकी सुस्थितीत असावी, डागडुजी नियमित करावी, पुरेसा प्रकाश असावा, फरशी फिनेल टाकून किमान तीन वेळा स्वच्छ केलेली असावी, स्वच्छतागृहांचे संचलन करणारा प्रतिनिधी गणवेशात असावा, परिसर सुशोभित असावा, रंगरंगोटी संबंधित संस्थेने केलेली असावी, आदी सूचना या आदेशात आहेत.

याची अंमलबजावणी होत नसल्यास संबंधित स्वच्छतागृह चालविणाऱ्या संस्थेला दंडात्माक कारवाई करण्याबरोबर ठेका रद्द करण्‍याची शिफारस करण्याचे अधिकार आगार व्यवस्‍थापकांना दिले आहेत. आगारप्रमुख किंवा वरिष्‍ठ अधिकारी १ ते ३१ मार्च या कालावधीत अचानक तपासणी मोहीम राबविणार आहेत. मोहीम कालावधीत स्वच्‍छगृहात गैरसोयी आढळल्यास संबंधित संस्थेला प्रसंगी काळ्या यादीत टाकले जाणार आहे.

नव्या आदेशानुसार एसटी बसस्थानकावरील स्वच्छतागृह अधिक निटनेटकी व स्वच्छ होतील. त्यामुळे प्रवाशांना व एसटी कर्मचाऱ्यांना प्रवास काळात त्याचा वापर करणे अधिक सुलभ व सोयीचे होईल. प्रवास सुखद होईल, अशी अपेक्षा आहे.

-अभिजित भोसले, मुख्य जनसंपर्क अधिकारी, एसटी महामंडळ

स्वच्छतागृहाचे वापरकर्ते

  • राज्यभरातील एसटीचे ४२ लाख रोजचे प्रवासी

  • एसटीचे ९८ हजार कर्मचारी

  • बसस्थानकावरील ठेकेदार स्वच्छतागृहे - ३५०

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Lok Sabha Election : बाबाजी‘ फॅक्टरमुळे नाशिकमध्ये ‘काटे की टक्कर', शेवटच्या दोन दिवसात आले महत्व

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धुळ्यात एल एम सरदार हायस्कूल येथील ईव्हीएम बंद पडल्याने गोंधळ

Mobile Hacks: 'या' सोप्या ट्रिक्स वापरा, मोबाईलमधील फोटो डिलिट करण्याची येणार नाही वेळ

Lok Sabha Election: विरोधकांनीही मुस्लिम उमेदवारांना ठेवले दूर! 2019 च्या तुलनेत 2024 ची स्थिती काय?

RCB vs CSK: धोनीच्या षटकारामुळे रिंकूची आठवण... CSK विरूद्ध शेवटच्या ओव्हरला काय होत्या भावना, यश दयालच्या वडिलांकडून खुलासा

SCROLL FOR NEXT