Sulkud Water Scheme esakal
कोल्हापूर

Sulkud Water Scheme : इचलकरंजीचा पाणीप्रश्न पेटला, तिसरा पर्याय पुढं येण्याची शक्यता; CM शिंदेंच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक

सुळकूड येथून पाणी योजना (Sulkud Water Scheme) मंजूर झाली असली तरी योजनेला विरोध होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

'इचलकरंजी शहराला शुद्ध पाणी देतानाच इतर गावांना टंचाईचा सामना करावा लागू नये, यावर विचार मंथन सुरू आहे.'

मुंबई : इचलकरंजी (Ichalkaranji) शहराचा पाणीप्रश्न पेटला आहे. सुळकूड येथून पाणी योजना (Sulkud Water Scheme) मंजूर झाली असली तरी योजनेला विरोध होत आहे. त्यामुळे याबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता .१) दुपारी २ ला बैठक होणार आहे. विधानभवनातील समिती सभागृहात बैठक आहे. त्यात इचलकरंजी शहराला पाणी देण्यासाठी तिसऱ्या पर्याय पुढे येण्याची शक्यता आहे.

बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार, कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक, आमदार सर्वश्री प्रकाश आबिटकर, प्रकाश आवाडे, सतेज पाटील, राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार सुरेश हाळवणकर, संजयबाबा घाटगे, उल्हास पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह संबंधित शिष्टमंडळ, जलसंपदा, जीवन प्राधिकरण विभागाचे अधिकारी व राजकीय प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

मंत्री मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, इचलकरंजी शहराला शुद्ध पाण्याची अत्यंत गरज आहे. यापूर्वी पंचगंगा, कृष्णा नदीतून (Panchganga, Krishna River) योजनाही करण्यात आल्या आहेत; मात्र कृष्णा नदी पाणी योजनेतून भौगोलिक परिस्थितीमुळे अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे दूधगंगा नदीवरून सुळकूड पाणी योजना मंजूर केली आहे; मात्र यावर्षी कमी पाऊस झाल्याने सहा टीएमसी पाणी कमी झाले आहे. त्यामुळे लोकांना पिण्यासह शेतीच्या पाण्यासाठी टंचाई जाणवत आहे. परिणामी इचलकरंजी शहरासाठी तिसरा पर्याय द्यावा लागणार आहे.

इचलकरंजी शहराला शुद्ध पाणी देतानाच इतर गावांना टंचाईचा सामना करावा लागू नये, यावर विचार मंथन सुरू आहे. शुक्रवारच्या बैठकीत आणखी एका पर्यायावर विचार केला जाईल; मात्र कोणावरही अन्याय होऊ न देता इचलकरंजी शहराला पाणी देण्यात येईल.

-हसन मुश्रीफ, पालकमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT