कोल्हापूर

राधानगरी-भुदरगड पट्ट्यात ‘बॉक्सिंग’ला पोषक वातावरण

CD

बॉक्सिंगचा संग्रहित फोट वापरणे...
.....
तालुक्यातील खेळ प्रकार ः भाग ३
.............
राधानगरी-भुदरगड पट्ट्यात ‘बॉक्सिंग’ला पोषक वातावरण

मजबूत शरीरयष्टीमुळे तरुणांचा वाढला ओघ; अनेक खेळाडू भारतीय संघात


सुयोग घाटगे : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० : ‘क्रीडा नगरी’ म्हणून ओळख असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याची एका वेगळ्या खेळामध्ये ख्याती आहे. राधानगरी-भुदरगड हा संपूर्ण पट्टा निसर्गसंपन्न आहे. प्रसन्न, आल्हाददायक वातावरण आणि स्वच्छ हवा यामुळे या भागाची ओळख वेगळीच आहे. याच पट्ट्यात मैदानी खेळासह बॉक्सिंगही वाढत आहे. दुर्गम भाग असल्याने मुळातच मजबूत शरीरयष्टी ही निसर्गदत्त देणगी अनेकांना लाभली आहे. याच सामर्थ्याचा वापर आता क्रीडा निपुणतेसाठी होऊ लागला आहे.
मुरगूड, गारगोटी, चंदगड, आजरा या भागांमध्ये बॉक्सिंगने चांगले बाळसे धरले आहे. गेल्या दशकाहून अधिक काळ येथे बॉक्सिंगसाठी अनेक खेळाडू पुढे येत आहेत. स्थानिकच नाही तर अन्य ठिकाणांहून या ठिकाणी खेळाडूंचा वाढता ओघ व एनआयएस पात्र प्रशिक्षक या मातीतून घडत आहेत. या संपूर्ण पट्ट्यात ३०० हून अधिक बॉक्सिंग खेळाडू घडत आहेत. यामध्ये शालेय वयातील खेळाडूंची संख्या सर्वाधिक असल्याने हे समाधानाचे चित्र आहे. मुरगूड येथे नावीन्यपूर्ण योजनेतून जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या सहयोगाने तीन लाख रुपयांचे बॉक्सिगसाठी आवश्यक साहित्य मिळाले आहे. त्यामुळे येथील खेळाडूंना चांगली सुविधा उपलब्ध होऊ लागली आहे.
.....
चौकट  
बॉक्सिंगससाठी जागा आरक्षित
डिफेन्स, रेल्वेसह केंद्र व राज्य शासनाच्या विविध सरकारी नोकऱ्यांसाठी आरक्षण व खासगी कंपन्यातही बॉक्सिंग खेळासाठी विशेष जागा आरक्षित केल्या जातात. यामुळे तरुणांच्या भविष्याचा प्रश्न सुटणार हे तितकेच महत्त्वाचे ठरत आहे.
...
चौकट
भारतीय संघात जिल्ह्यातील खेळाडू
भारतीय बॉक्सिंग संघामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील १० हून अधिक मुले पुरुष संघात, तर ११ हून अधिक मुली महिला संघात आहेत. येत्या काळात विविध वयोगटांत हा आकडा आणखी वाढेल. तसेच वरिष्ठ गटामध्ये किमान २० खेळाडू कोल्हापूर जिल्ह्यातील असतील असे आशादायक चित्र आहे.
....
कोट....
बॉक्सिंग जोखमीचा खेळ आहे. यासाठी चपळता आणि चांगली सुदृढ शरीरयष्टी महत्त्वाची असते. हे सातत्यपूर्ण सरावाने साध्य होते. मुरगूडसारख्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून यासाठी प्रयत्नशील आहे. त्याला यश येत असून, आणखी काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत येथील खेळाडू खेळतील.
एकनाथ आरडे 
(समाप्त)
....................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Mane Resigns : माजी मंत्री बाळासाहेब पाटलांना मोठा धक्का; मानेंनी जिल्हाध्यक्षपदाचा दिला राजीनामा, अजितदादांच्या पक्षात करणार प्रवेश

Chhatrapati Sambhajinagar Crime: तक्रारदारच निघाला आरोपी; व्याजाने घेतलेले पैसे परत करण्यासाठी लुटीचा बनाव

Latest Marathi News Live Update : संजय राऊत यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी कपालेश्वर महादेवांना अभिषेक

Nagpur News: गडकरी प्रमुख पाहुणे असताना स्टेजवर दोन महिला पोस्टमास्टरमध्ये धक्काबुक्की अन् शाब्दीक खटके; नेमकं काय घडलं?

१८०० कोटींचा जमीन घोटाळा, गुन्हा दाखल झालेले तिघे कोण? पार्थ पवारांवर गुन्हा का नाही? वाचा A to Z

SCROLL FOR NEXT