कोल्हापूर

इथेनॉल निर्मिती

CD

‘बी-हेवी’ पासून इथेनॉल निर्मितीला परवानगी
केंद्र सरकारचा निर्णय; ६.७ लाख टन बी-हेवी मोलॅसिस वापरता येणार

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २५ ः केंद्राने साखर कारखान्यांना इथेनॉल उत्पादनासाठी ६ लाख ७० हजार टन ‘बी-हेवी’ मोलॅसिस वापरण्याची परवानगी दिली आहे. साखरेच्या किमतीत अपेक्षेप्रमाणे वाढ होत नसल्याने या निर्णयाचा साखर उद्योगाला मोठा दिलासा मिळाला. इथेनॉल निर्मिती प्रकल्पनिहाय ३१ मार्चअखेरच्या बी-हेवी मोलॅसीसच्या मात्रेतून तयार होणाऱ्या इथेनॉलची खरेदी करता येईल, असे या आदेशात म्हटले आहे.
नव्या आदेशाने ‘बी-हेवी’ मोलॅसिसच्या शिल्लक साठ्यांमध्ये अडकलेल्या सुमारे ७०० कोटी रुपयांची रक्कम वापरता येणार आहे. त्यातून तयार होणाऱ्या ३८ कोटी लिटर इथेनॉलच्या विक्रीतून सुमारे २३०० कोटी रुपये इतकी रक्कम देशभरातील आसवनी प्रकल्प असणाऱ्या कारखान्यांना उपलब्ध होईल. यामुळे साखरेचे साठे कमी होण्यात व त्यातून स्थानिक बाजारपेठेतील साखरेचे विक्री दर सुधारण्यात मदत होणार असल्याचे मत या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले.
डिसेंबर २०२३ रोजी केंद्राने घेतलेल्या आढाव्यामध्ये देशातील साखरेची उपलब्धता कमी राहण्याचा आणि त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर स्थानिक बाजारातील साखरेच्या दरात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला गेला. त्यामुळे केंद्राने ७ डिसेंबर २०२३ च्या आदेशाद्वारे उसाचा रस, साखरेचा अर्क व ‘बी-हेवी’ मळीपासून इथेनॉल निर्मितीस तातडीने बंदी घातली. अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे संपूर्ण साखर उद्योगात खळबळ उडाली होती. कारखान्यांमध्ये तयार असलेले इथेनॉल, इथेनॉलसाठी लागणारे ‘बी-हेवी’ मळीचे साठे तसेच तेल कंपन्यांशी केलेले करार या सगळ्यांवरच या निर्णयाने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. त्याच सोबत इथेनॉल निर्मितीच्या राष्ट्रीय कार्यक्रमाअंतर्गत केंद्र शासनाकडून मिळालेले प्रोत्साहन आणि दिलेल्या आश्वासनाच्या विश्वासार्हतेवर देखील साशंकता निर्माण झाली. या क्षेत्रात झालेली व होणारी आर्थिक गुंतवणूक धोक्यात येण्यासारखी परिस्थिती उद्‌भवली.
या पार्श्वभूमीवर इथेनॉल निर्मितीवरीस बंधने उठविण्‍याची मागणी राष्‍ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघासह साखर उद्योगातून होत होती. ही परिस्‍थिती पाहून केंद्राने १५ डिसेंबर २०२३ च्या सुधारित आदेशानुसार जास्तीत जास्त १७ लाख टन साखर इथेनॉल निर्मितीकडे वळविण्याची परवानगी दिली. याच दरम्‍यान डिसेंबर मध्ये झालेल्या पावसामुळे उसाचे व साखरेचे उत्पादन अनपेक्षित वाढले. परिस्‍थिती बदलल्याने इथेनॉल निर्मितावरील नियम आणखी शिथिल करावेत, या मागणीने जोर धरला. साखरेची उपलब्धता अगोदरच्या अंदाजापेक्षा २० ते २५ लाख टनाने वाढली. त्यातून हा नवा आदेश काढला.
............
चौकट
असा होईल फायदा
कारखाने बंद झाले असले तरी अनेक कारखान्यांकडे ‘बी-हेवी’ मोलॅसीस शिल्लक आहे. या निर्णयामुळे ते आता इथेनॉल निर्मितीसाठी वापरण्यात येणार आहे. साठा निर्गत होऊन चांगली रक्कम कारखान्यांना मिळू शकेल. याचा फायदा शेतकऱ्यांना शिल्लक राहिलेली बिले देण्यासाठी होऊ शकेल.
...............
कोट
या निर्णयामुळे कारखान्यांना बी हेवी मळीच्या शिल्लक साठ्यामध्ये अडकलेली रक्कम मिळू शकेल. आसवनी प्रकल्प असणाऱ्या कारखान्यांना याचा फायदा होईल, जेणेकरून शेतकऱ्यांच्या उसाची रक्कम वेळेत व पूर्णपणे मिळण्यास मदत होईल. या प्रक्रियेमधून सुमारे ३.२५ लाख टन अतिरिक्त साखर इथेनॉल निर्मितीकडे वळविली जाणार आहे.
-हर्षवर्धन पाटील, अध्यक्ष, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ
.........
कोट
बी-हेवी मोलॅसिस साठ्याचे काय करायचे ही चिंता कारखानदारांना होती. यात कोट्यवधी रुपये कारखान्यांचे अडकून होते. त्यामुळे या निर्णयाची प्रतीक्षा होती. आता साठे रिकामे होऊन संभावित नुकसान टळू शकेल
-विजय औताडे, साखरतज्ज्ञ
.........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: रिषभला जसं बाद केलं तसंच करायला गेले, पण सहावेळा तोंडावर आपटले; इंग्लंडची चूक भारताच्या पथ्यावर Video

Pune News: माेठी बातमी! 'संजय जगताप यांचा पुणे जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा'; पुरंदर-हवेली मतदारसंघात खळबळ

Solapur: राष्ट्रवादीच्या दोन जिल्हाध्यक्षपदाचा तिढा सोमवारी सुटणार?; बळिराम साठे ज्येष्ठ नेते शरद पवारांना भेटणार

Tarachand Agarwal CA Final: मानलं बॉस...! ७१व्या वर्षी पास करून दाखवली कठीण 'CA' परीक्षा अन् स्वप्न पूर्ण केलंच

ENG-U19 vs IND-U19: भारतीय कर्णधाराचे इंग्लंडमध्ये दमदार शतक; १४ चौकार अन् २ षटकारांसह इंग्लंडच्या गोलंदाजांना रडवले

SCROLL FOR NEXT