कोल्हापूर

आवश्यक- संक्षिप्त

CD

शाहू चित्रमंदिराचा
आज वर्धापन दिन

कोल्हपूर ः येथील मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीचे माहेरघर असणाऱ्या शाहू चित्रमंदिराचा ७८ वा वर्धापन दिन बुधवारी (ता.१५) साजरा होणार आहे. गेली साडेसात दशके मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ या चित्रमंदिराने अनुभवला आहे. वर्धापनदिनानिमित्त छोटेखानी स्नेहमेळावा होणार असून, सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन व्यवस्थापनाने केले आहे.
............
फिल्म सोसायटीतर्फे
शुक्रवारी
‘एक दिन अचानक’
कोल्हापूर ः येथील कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीतर्फे शुक्रवारी (ता.१७) ‘एक दिन अचानक’ हा हिंदी सिनेमा दाखवला जाणार आहे. राजर्षी शाहू स्मारक भवनात सायंकाळी साडेसहाला हा सिनेमा दाखवला जाईल. मृणाल सेन दिग्दर्शित हा सिनेमा असून, व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्याची विशेष दखल घेतली होती. उत्तरा बावकर या राष्ट्रीय पुरस्काराच्या मानकरी ठरल्या होत्या. उमापद चौधरी यांनी १९७७ मध्ये बंगाली भाषेत लिहिलेल्या ‘चीज’ या कादंबरीवर हा सिनेमा बेतला आहे.
..............
‘सिम्बॉलिक’ शाळेत
आयुषी चौगुले प्रथम

कोल्हापूर : शिरोली पुलाची (ता. हातकणंगले) येथील केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) मान्यताप्राप्त येथील सिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयुषी चौगुले या विद्यार्थिनीने ९६ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. अक्षया शिराळे, आबीद शेख (९४ टक्के), स्वरूप कोरगावे, नितीन रजपूत (९१ टक्के) यांनी गुणानुक्रमे क्रमांक मिळवले. त्यांना शाळेच्या संस्थापक गीता पाटील, मुख्याध्यापक प्रशांत काटकर, संस्थेचे अध्यक्ष गणपतराव पाटील व प्रशासक अधिकारी म्रिनाल पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UP Dog Life Imprisonment : ऐकावं ते नवलच! आता उत्तर प्रदेशात कुत्र्यालाही होणार जन्मठेप; योगी सरकारचा नवा निर्णय

Double Decker Bus: पुणेकरांची स्वप्नपूर्ती! 'मनपा'च्या ताफ्यात डबल डेकर बस; 'या' मार्गांवर धावणार

Thane Traffic: घोडबंदर मार्गावर दिवसा 'या' वाहनांना नो एन्ट्री, एकनाथ शिंदे यांचे निर्देश जारी

OCD Explained: OCD म्हणजे फक्त स्वच्छतेशी संबंधित नाही! डॉक्टरांनी सांगितले ऑब्सेसिव्ह कंपलसिव्ह डिसॉर्डरचे खरे स्वरूप

Kannad News : चिकलठाणच्या गांधारी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

SCROLL FOR NEXT