कोल्हापूर

शहरात हुलकावणी, जिल्ह्यात वादळी

CD

शहरात हुलकावणी, जिल्ह्यात पावसाची हजेरी
ताराबाई उद्यान परिसरात झाडाची फांदी कोसळली; शिरोळ तालुक्याला झोडपले

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १६ ः शहरात पावसाने हुलकावणी दिली असली तरी जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह पाऊस झाला आहे. गेली दोन दिवस शहरात पावसाचे वातावरण झाले. सोसाट्याचा वारा दहा-पंधरा मिनिटे वाहिला. दुपारी दोन ते चार दरम्यान जोरदार पाऊस येईल अशी अपेक्षा होती. मात्र, रात्री उशिरापर्यंत पावसाने हुलकावणी दिली.
शहरात आज दुपारपर्यंत उन्हाचा तडाखा होता. अंगाची लाहीलाही होत असतानाच दुपारनंतर आकाश काळवटले आणि उन्हापासून काही प्रमाणात सुटका मिळाली. मात्र, यानंतर सुरू झालेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने वादळी पाऊस येईल, असे वातावरण होते. अनेकांनी घरी जाण्याची घाई केली. रस्त्यावरील गर्दीही काही प्रमाणात कमी झाली. मात्र, पुन्हा सहानंतर काही प्रमाणात पावसाचे वातावरण निवळले. यानंतर मात्र रात्री उशिरापर्यंत शहरात पावसाने हुलकावणी दिली. पावसाने हुलकावणी दिलेला हा आजचा दुसरा दिवस होता.
दरम्यान, शहरात दुपारी झालेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आज ताराबाई पार्क येथील महाराणी ताराबाई उद्यान परिसरात एका झाडाची मोठी फांदी रस्त्यात कोसळली. त्यामुळे काही प्रमाणात वाहतूक मार्गात बदल केला. अग्‍निशमन दलाच्या जवानांनी तेथील फांदी बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली. याव्यतिरिक्त शहरात काहीही नुकसान झाले नसल्याचे अग्‍निशमन दलातून सांगण्यात आले.
-
जयसिंगपूर वीजपुरवठा खंडित
जयसिंगपूर : शहरासह शिरोळ तालुक्याला गुरुवारी (ता. १६) अवकाळी पावसाने झोडपून काढले. उसासह सर्वच पिकांना पोषक असणाऱ्या पावसाने तालुक्यातील विविध गावांतील आठवडा बाजारात मात्र त्रेधातिरपीट उडविणारा ठरला. शहरातील वीजपुरवठा काही काळ खंडित करण्यात आला.
पावसाने वीटभट्टी मालकांचे नुकसान झाले, तर जयसिंगपूर शाहूनगर, उदगाव, कुरुंदवाड आठवडी बाजारातील जनजीवन काही काळ विस्कळीत झाल्याने दैना उडाली. गुरुवारी सकाळपासूनच हवेत मोठ्या प्रमाणात उष्मा जाणवत होता. यामुळे अंगाची लाही लाही होऊन जीव कासावीस झाला होता. दुपारपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले तसेच ढगांचा गडगडाट सुरू होता.
सहाच्या सुमारास अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. हा पाऊस पिकांना पोषक असल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. अचानक आलेल्या पावसामुळे शिरोळ तालुक्यातील अनेक आठवडी बाजारातील व्यापारी भाजी विक्रेते यांची त्रेधातिरपट उडाली, तर खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची तारांबळ उडाली होती. अचानक आलेल्या पावसामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारांनी पावसापासून संरक्षण होण्याकरिता आडोसा शोधून त्या ठिकाणी थांबल्यामुळे रस्त्यावरील वाहनांची वर्दळ कमी झाली होती.
--
स्वतंत्र लावा
02561
वादळी वाऱ्यामुळे भाततळीत
बीएसएनएलचा टॉवर कोसळला

शाहूवाडी, ता. १६ ः वादळी वाऱ्यामुळे आज दुपारी ४ च्या सुमारास भाततळी (ता. शाहूवाडी) येथील बीएसएनएलचा दूरध्वनी तरंग सेवेचा टॉवर शेजारील घराच्या अंगणात कोसळला. मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही.
भाततळी या ठिकाणी वीस वर्षांपूर्वी बीएसएनएलने दूरध्‍वनी सेवेसाठी सुमारे ८o फूट उंचीचा लोखंडी टॉवर उभारला आहे. भाततळी विशाळगड परिसरात बीएसएनएलची तरंग सेवा देण्यासाठी या टॉवरचा उपयोग केला जात होता. आज दुपारी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे टॉवर कोसळला. विलास रावजी पाटील यांच्या घराशेजारी आप्पा पाटील यांच्या मालकीच्या जमिनीत टॉवर आहे. विलास पाटील यांच्या घरासमोर दारात टॉवर कोसळला. त्यात त्यांच्या घराच्या पुढील बाजूच्या भिंतीचे थोडे नुकसान झाले. मात्र, कोणतीही जीवितहानी झाली नाही. टॉवर कोसळल्याची माहिती तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमुख तहसीलदार रामलिंग चव्हाण यांना समजताच त्यांनी तातडीने माहिती घेत आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कामाला लावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ola Uber News : ओला, उबरची भाडेवाढ ! प्रवास १.५ पट होणार महाग, प्रवाशांच्या खिशाला बसणार कात्री

Scam Alert Kolhapur : गोलमाल है भाई गोलमाल है! एक गाव आणि चार भक्त निवास, आणखी दोन भक्त निवासासाठी ४० लाखांची मंजुरी

पुण्यातील ऐतिहासिक पर्वती टेकडीचे सौंदर्य धोक्यात? TDR वाटपाचा वाद पुन्हा पेटला; चतुःशृंगी-शनिवारवाड्याला वेगळा न्याय का?

Latest Marathi News Updates : वाहतूक कोंडीवर सोमवारपर्यंत अहवाल द्या, पुणे पालिका आयुक्तांचे आदेश

iPhone 17 आजपासून भारतात उपलब्ध, खरेदीसाठी स्टोअरबाहेर झुंबड; मध्यरात्रीपासून रांगेत, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT