कोल्हापूर

मर्दानी खेळाचा आखाडा, यादवनगर, सोल्जर, शालिनी पॅलेस उपांत्य फेरीत

CD

87156

मर्दानी खेळाचा आखाडा, यादवनगर, सोल्जर, शालिनी पॅलेस उपांत्य फेरीत

केएसए ‘सी’ डिव्हीजन लीग फुटबॉल स्पर्धा ः विजेतेपदाचा दावेदार कोण ठरणार, याकडे लक्ष

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १ ः शाहू छत्रपती केएसए ‘सी’ डिव्हीजन लीग फुटबॉल स्पर्धेत मर्दानी खेळाचा आखाडा (ए), यादवनगर फुटबॉल क्लब, सोल्जर लक्षतीर्थ फुटबॉल क्लब, शालिनी पॅलेस मित्रमंडळ या चार संघांनी प्रतिस्पर्धी संघावर मात करीत स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. आज या चार संघांत सकाळी उपांत्य फेरी, तर दुपारी तीन वाजता अंतिम लढत होणार आहे. त्यामुळे तमाम फुटबॉल शौकिनांचे लक्ष विजेतेपद कोणता संघ पटकावितो; याकडे लागून राहिले आहे.
बारा दिवसांहून अधिक काळ सुरू असलेल्या स्पर्धेत छत्रपती शाहू स्टेडियम व पोलो मैदानावर ७१ संघांमध्ये तब्बल ११९ सामने झाले. यातून चार संघ आज उपांत्य फेरीत पोचले.
छत्रपती शाहू स्टेडियमवर आज मर्दानी खेळाचा आखाडा (ए) संघाने क्रांतिवीर राजगुरू तरुण मंडळावर एक विरुद्ध शून्य गोलने विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली. हा विजयी गोल किरण पाटील याने २२ व्या मिनिटास नोंदविला.
दुसऱ्या उपांत्यपूर्व लढतीत यादवनगर फुटबॉल क्लबने श्रीकृष्ण फुटबॉल क्लबचा एक विरुद्ध शून्य गोलने पराभव करीत उपांत्य फेरी गाठली. यादवनगरकडून हा एकमेव विजयी गोल शकील जमादारने ४५ व्या मिनिटास नोंदविला. तिसरा उपांत्यपूर्व सामना शालिनी पॅलेस मित्र मंडळ व शिव स्पोर्टस् यांच्यात झाला. सामन्याच्या २० व्या मिनिटास शालिनी पॅलेस संघाकडून शांतिदूत पोवारने गोल नोंदविला. शिव स्पोर्टसकडून प्रसाद पाटीलने ५२ व्या मिनिटास गोल करीत सामना १-१ असा बरोबरीत आणला. टायब्रेकरमध्ये शालिनीकडून रणजीत मोरे, सार्थक पाटील, शांतिदूत पोवार यांनी गोल नोंदविला. तर शिव स्पोर्टसकडून अभयसिंह कदम, प्रसाद पाटील, स्वयंसिह पाटील यांचे फटके अडविण्यात आले. चौथ्या सामना सोल्जर लक्षतीर्थ फुटबॉल क्लब व वारे वसाहत तालीम मंडळ यांच्यात झाला. हा सामना वारे वसाहत संघाने एक विरुद्ध शून्य गोलने विजय मिळवला. हा सामना पूर्ण वेळेत गोलशून्य बरोबरीत राहिला. टायब्रेकरमध्ये हा सामना तीन विरुद्ध तीन असा बरोबरीत राहिला. त्यानंतर सडनडेथमध्येही हा सामना पुन्हा दोन विरूद्ध दोन बरोबरी झाल्यानंतर तिसरा फटक्यात सोल्जरच्या प्रसाद नांद्रेकरने गोल केला. तर वारे वसाहतच्या शुभम बेडेकरचा फटका सोल्जरचा गोलरक्षक ओंकार वरूटेने अडवून संघास विजय मिळवला. या विजयामुळे संघाने उपांत्य फेरी गाठली.
..........
आजच्या उपांत्य लढती अशा,
सकाळी ७ वा. यादवनगर फुटबॉल क्लब विरुद्ध मर्दानी खेळाचा आखाडा (ए)
सकाळी ८ वा. शालिनी पॅलेस मित्र मंडळ विरुद्ध सोल्जर लक्षतीर्थ फुटबॉल क्लब
दुपारी ३ वा. उपांत्य फेरीतील दोन विजेत्यांमध्ये अंतिम लढत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman: रशियन महिला सापडली ते गोकर्णचं घनदाट जंगल... माणूस हरवला की रस्ता ही सापडणार नाही, फोटो पाहा

रशियन महिलेच्या मुलींचे वडील कोण? भारतात का आली होती? मोठे अपडेट समोर

Latest Maharashtra News Updates : आळंदीत रविवारी संत भेटीचा सोहळा, वारकरी संप्रदायाला अनुभवायला मिळणार दुग्धशर्करा योग

Local Elections 2025 : नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप, इच्छुकांचा अभ्यास, जिल्हा परिषद गट-गण प्रारूप रचना; निवडणूक मोर्चेबांधणीला सुरुवात

Kolhapur Chappal Prada : ‘प्राडा’ची टेक्निकल टीम कोल्हापुरी पायतान बघून भारावली, कारागिरांची हस्तकला पाहून म्हणाले...

SCROLL FOR NEXT