कोल्हापूर

हाताखाली आलेली पोरं गेली...

CD

87582
...

हाताखाली आलेली पोरं गेली...

बाप निःशब्द, आईचा आक्रोश ः एकाच अपघातात दोन मुले ठार

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ ः दौलतनगरात हे चौकोनी कुटुंब राहते. आज दुपारी आत्याच्या मुलासोबत दोघेही सायबर चौकात नाश्‍ता करण्यासाठी गेले. दोघे जाताना नुकताच दहावी उत्तीर्ण झालेला हर्षदसुद्धा पाठी लागून गेला. सायबर चौकात भरधाव वेगाने आलेल्या मोटारीने त्यांना उडविले आणि हाताखाली आलेली १६ आणि १९ वर्षांची दोन्ही मुले ठार झाली. सीपीआर आणि त्यांच्या घराजवळसुद्धा बाप निःशब्द होता तर आईचा आक्रोश हृदय पिळवटणारा होता.
सचिन पाटील हे कुटुंब प्रमुख. ते खासगी नोकरी करतात. दौलतनगरात गोखले विद्यालयाशेजारी राहतात. त्यांच्याकडे आत्याचा मुलगासुद्धा असतो. आतेभाऊ जयराज संतोष पाटील हा सुद्धा कोल्हापुरात राहण्यासाठी आहे. तो आयटीआय झाला असून एमआयडीसीत नोकरीला आहे. आज त्याला सुटी असल्यामुळे दुपारी प्रथमेश आणि जयराज दोघेही नाश्‍ता करण्यासाठी दौलतनगरातून सायबर चौकात निघाले. त्याचवेळी हर्षदसुद्धा पाठी लागला. अखेर ते सायबर चौकात गेले. तेथे भरधाव वेगाने आलेल्या मोटारीने त्यांना उडविले. त्यातील हर्षद ठार झाल्याची माहिती वडिलांना मिळाली. त्यांच्या सहकाऱ्यांसह ते सीपीआरमध्ये आले. तेथे हर्षद ठार झाल्याचे त्यांनी ऐकले आणि त्यांना काही सुचलेच नाही. ते रडले सुद्धा नाहीत. सहकाऱ्यांनी तेथेच झाडाखालील कट्ट्यावर त्यांना बसविले. तेथे सुद्धा ते निःशब्द होते. त्यांच्याकडे पाहून इतरांचे डोळे पाणवले होते. काही वेळाने त्यांना घरी नेण्यात आले. यावेळी त्यांना त्यांचा दुसरा मुलगाही जखमी असल्याचे माहिती होते. घरी पोहोचले तेव्हा पत्नीने आक्रोश केला. कशीबशी सायंकाळ टळली. रात्री आठच्या सुमारापर्यंत एका मुलाचा दुःखाचा डोंगर सावरत असतानाच दुसरा मुलगा प्रथमेश सुद्धा गेल्याची बातमी धडकली. वैऱ्याच्याही वाट्याला अशी परिस्थिती येऊ नये, अशीच भावना अनेकांनी बोलून दाखविली.
...
हर्षदचे सी.ए. व्हायचे स्वप्न अधुरे...
हर्षद हा नुकताच दहावी ६६ टक्क्यांनी उत्तीर्ण झाला होता. त्याला भविष्यात कॉमर्सकडे जाऊन सी.ए. व्हायचे होते. मात्र, आजच्या अचानक झालेल्या दुर्घटनेचा तो बळी ठरला आणि त्याचे सी.ए. व्हायचे स्वप्न अधुरे राहिल्याचे त्याच्या मित्रांनी सांगितले.
...
‘भाई-भाई’ ...
दोघे सख्‍खे भाऊ एकमेकांवर जीवापाड प्रेम करीत होते. एकाच दुचाकीवर बसून त्यांनी त्यांचे छायाचित्र काढले होते. त्या छायाचित्राखाली त्यांनी ‘भाई-भाई’ असे लिहिले होते. आज हेच दोन्ही ‘भाई-भाई’ जगात राहिले नाहीत. त्यांचे व्हॉटस्‌ ॲपवर व्हायरल झालेले हे छायाचित्र आज सीपीआरमध्ये दौलतनगरातील अनेकांच्या मोबाईल स्क्रिनवर दिसत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tarachand Agarwal CA Final: मानलं बॉस...! ७१व्या वर्षी पास करून दाखवली कठीण 'CA' परीक्षा अन् स्वप्न पूर्ण केलंच

ENG-U19 vs IND-U19: भारतीय कर्णधाराचे इंग्लंडमध्ये दमदार शतक; १४ चौकार अन् २ षटकारांसह इंग्लंडच्या गोलंदाजांना रडवले

माेठी बातमी! 'जुन्या थकीत कर्जदारांना दिलासा नाही'; जिल्हा बँकेचा शासनाकडे प्रस्ताव, माेठे अपडेट आले समाेर..

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

Latest Marathi News Updates : पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का; माजी आमदार संजय जगताप यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा दिला राजीनामा

SCROLL FOR NEXT