कोल्हापूर

विशाळगड अतिक्रमणमुक्त होईपर्यंत आंदोलन

CD

विशाळगड अतिक्रमणमुक्त
होईपर्यंत आंदोलन : भिवटे

सकल हिंदू समाजतर्फे रविवारी पायथ्याला निदर्शने

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १२ : विशाळगड किल्ला अतिक्रमणमुक्त व्हावा यासाठी सकल हिंदू समाजाने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. दुर्गप्रेमी रवींद्र पडवळ यांनी सिंहगड ते विशाळगड अशी सुरू केलेली पदयात्रा कोल्हापुरात पोहोचली. १४ जुलैला या पदयात्रेतील सहभागींसह विविध संघटना एकत्रित मिळून विशाळगडाच्या पायथ्याला आंदोलन करणार असल्याची माहिती दिलीप भिवटे व संभाजी साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विशाळगड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील महत्त्वाचा गड होता. सध्या येथे येणाऱ्या शिवप्रेमींना केवळ अवशेष पाहायला मिळतात. तसेच मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे वाढल्याने गडाला विळखा पडला आहे. ही अतिक्रमणे काढावी यासाठी देशव्यापी आंदोलन उभारण्यात येणार असून, याचाच भाग म्हणून २९ जूनपासून सिंहगड ते विशाळगड पदयात्रा काढण्यात आल्याचे रवींद्र पडवळ यांनी सांगितले. ही पदयात्रा १४ जुलैला विशाळगडाच्या पायथ्याला पोहोचून मुख्य मार्ग अडवत प्रशासनाचे लक्ष वेधणार असल्याचे सांगितले.
साळूंखे म्हणाले, ‘अतिरेकी कारवायात सहभागी असलेला यासीन भटकळ यानेही विशाळगडावर वास्तव्य केल्याचे समोर आल्याने त्याला येथे आश्रय देणाऱ्यावर कारवाई करावी. गडावर अनेक बोअरवेल मारताना पुरातत्त्व खात्याने का दुर्लक्ष केले याचाही जाब विचारणार आहे.’ पत्रकार परिषदेला अनिल चोरगे, आदित्य उलपे, पी. एस. कुलकर्णी, प्रिया घाडगे, सौरभ निकम, विशाल पाटील, प्रसाद सांगावकर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगातला सगळ्यात मोठा डॉन; 'मुळशी पॅटर्न'प्रमाणेच बकासूर झाला अन् अमेरिकेच्या जेलमध्ये तडफडून मेला

Lawyer Rakesh Kishor: मोठी बातमी! सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलावर कारवाई; बार कौन्सिलने घेतला मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : खासदर शोभाताई बच्छाव यांचा पाचोरा तालुक्यातील पाहणी दौरा पूर्ण

Akola News : आरक्षण जाहीर! कुठे धक्का तर कुठे मिळाली संधी; जिल्ह्यातील पाच नगराध्यक्ष पदांवर महिलाराज

Kannad Nagarparishad Election : कन्नड नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव; शहरात ‘भावी वहिनीसाहेब’ ताईसाहेब चर्चेत

SCROLL FOR NEXT