Satej Patil Press Conference in Kolhapur 
कोल्हापूर

Satej Patil Kolhapur : कोल्हापूरमध्येही महायुतीचा फोडाफोडीचा प्रयोग; सतेज पाटील यांचा आरोप

Jayashri Jadhav Kolhapur Politics : गुवाहाटी, सुरतनंतर कोल्हापूरमध्येही महायुतीचे फोडाफोडीचे राजकारण होत असल्याचा सतेज पाटील यांचा आरोप.

CD

कोल्हापूर : महायुतीचे सरकार फोडा-फोडीचे राजकारण करत आहे. गुवाहटी, सुरतनंतर आता कोल्हापूरमध्ये हा प्रयोग झाला. आमदार जयश्री जाधव यांना काँग्रेसचे उमेदवार म्हणून कोल्हापूरच्या जनतेने मोठ्या मताधिक्याने निवडून दिले. उत्तरमधून निवडणूक लढविणाऱ्या एका उमेदवाराला पराभवाची खात्री झाल्याने एका दिवसात जाधव यांचे मतपरिवर्तन करुन त्यांना शिंदे गटात प्रवेश करायला घेवून गेले. आमदार जाधव यांना उद्योगाबाबत किंवा इतर कोणत्या कारणांनी दबाव टाकला आहे का? हे पाहावे लागेल. मात्र आमदार जाधव यांनी एका रात्री पक्ष बदलला हे कोल्हापूरवासीयांना न पटणारे कृत्य केल्याची टीका आमदार सतेज पाटील यांनी केली.

कसबा बावडा येथील आमदार पाटील यांच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आमदार पाटील म्हणाले, शिवसेना उमेदवारांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे कोल्हापूरची जनता ही काँग्रेसच्या मधुरिमाराजे यांच्याच मागे राहिल यात शंका नाही. काँग्रेसची उमदेवारी देताना आमदार जाधव यांना यावेळी उमेदवारी घेवू नका अशी विनंती केली होती. त्यांनीही मान्य केले होते. अचानक त्यांच्यामध्ये काय परिवर्तन झाले आणि शिंदे गटाला विशेष विमान पाठवावे लागले. याच अर्थ मोठे काय तरी घडले आहे. त्यांच्यावर दबाव आणला का याचे उत्तर त्यांना द्यावे लागले.

फाईल अजित पवार यांना दाखवलीच कशी?

सत्तर हजार कोटींचा घोटाळा झाल्याची फाईल महायुतीचे सरकारवेळी होती. त्यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवार होते. गृहमंत्रालयाकडे गोपनीय असणारी फाईल अजित पवार यांना दाखवलीच कशी? हाच मोठा प्रश्‍न असल्याचे पाटील यांनी नमूद केले.

पोटनिवडणुकीत बहिण म्हणून निवडून दिले

मधुरिमाराजेंना उमदेवारी दिल्यामुळे आमदार जाधव नाराज होत्या का? याबाबत जाधव यांनी आपल्यासोबत काहीही चर्चा केलेली नाही. मात्र, पोटनिवडणुकीत आमची बहिण उभारली आहे म्हणून कोल्हापूर शहराने त्यांना निवडणून दिले, अशावेळेला किमान माझ्यासोबत तरी चर्चा करायला हवी होती, अशी खंत पाटील यांनी व्यक्त केली.

शंभर कोटींचे रस्ते गेले कुठे?

कोल्हापूर शहरासाठी मुख्यमंत्र्यांनी शंभर कोटींचे रस्ते मंजूर केले आहेत. वारंवार यावर चर्चा होते. मात्र, हे शंभर कोटी गेले कुठे? रस्ते व्हावेत म्हणून पालकमंत्र्यांनीही आयुक्तांना जाब विचारला. शंभर कोटी मंजूर असतील तर वर्कऑर्डर का दिली जात नाही. महायुतीने केवळ बनावट कामे केल्यामुळे कोल्हापूरची जनता त्यांना मतदान करणार नाही, अशी टीका आमदार सतेज पाटील यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad Fort Illegal Hotels : रायगडावर विनापरवानगी हॉटेल, रेस्टॉरंट, कॅफे; रोप -वे कंपनीचे अतिक्रमण, संभाजीराजेंचा घणाघात, "पुरातत्व विभागाकडून पाठबळ"

बिबट्यांना 'जन्मठेप', बालकांचा बळी घेणाऱ्या ४ बिबट्यांबाबत वनविभागाचा मोठा निर्णय

Maharashtra Assembly Winter Session : विधानसभेचे हिवाळी अधिवेशन आजपासून, उपराजधानीत घातपाताची शक्यता; पोलिस यंत्रणा हाय अलर्टवर

Indigo Plane : ‘इंडिगो’चे विमान ‘पार्किंग बे’वरच! रविवारी ५० विमाने रद्द

आजचे राशिभविष्य - 08 डिसेंबर 2025

SCROLL FOR NEXT