कोल्हापूर

हिरकणी इलेव्हन विजयी.

CD

वरिष्ठ गट महिला हॉकी स्पर्धेत हिरकणी इलेव्हन विजयी
कोल्हापूर, ता. १२ : सरदार स्पोर्ट्स ग्रुपच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय तिरंगी वरिष्ठ गट महिला हॉकी स्पर्धेत हिरकणी इलेव्हन संघाने विजय मिळवला. मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर ही स्पर्धा झाली. उद्घाटन आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू व शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या शिल्पा जोशी, के.आय.टी कॉलेजच्या प्रा. अश्विनी शिंदे यांच्या हस्ते व हॉकी कोल्हापूरच्या अध्यक्षा सुरेखा पाटील, जिल्हा हॉकी संघटनेचे माजी अध्यक्ष विजय साळोखे- सरदार, हॉकी प्रशिक्षक मोहन भाडंवले,नजीर मुल्ला ,सागर जाधव व अमित शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना महाराणी येसूबाई विरुद्ध महाराणी ताराराणी या संघांमध्ये झाला. सामना महाराणी येसूबाई संघाने ३ विरुद्ध ० गोलने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेचा दुसरा उपांत्य सामना हिरकणी इलेव्हन विरुद्ध महाराणी ताराराणी संघांमध्ये झाला. हा सामना हिरकणी संघाने चार ४ विरुद्ध ० शून्य गोलने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला. या स्पर्धेचा अंतिम सामना महाराणी येसूबाई विरुद्ध हिरकणी इलेव्हन या संघांमध्ये होऊन हिरकणी संघाने २ विरुद्ध ० गोलने विजय मिळवत स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. विजेत्यांना माजी राष्ट्रीय हॉकी खेळाडू कविता साळोखे , कल्पना भोसले व जया शिंदे यांच्या हस्ते गौरवण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pranita Kulkarni: मतदानाला गेला नाहीस तर पैसे का घेतले? भाजप नगरसेविकेचा व्हिडिओ व्हायरल

विजय हजारे ट्रॉफीत 'प्लेअर ऑफ दी मॅच'ला १०,००० चं बक्षीस; मग विराट कोहली, रोहित शर्मा यांची मॅच फी किती होती? आकडा ऐकाल तर...

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये भररस्त्यावर तरुणांची गुंडागर्दी; दगडफेक व काठ्यांनी हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल

Nagpur Municipal Election : युतीत शिंदेसेनेला हव्यात २२ जागा; शिवसेनेच्या नेत्यांनी केले स्पष्ट

Kolhapur Administration : बिबट्या आला तेव्हाच जागे होणार का? साहित्य खरेदीत प्रशासनाची गंभीर बेपर्वाई

SCROLL FOR NEXT