कोल्हापूर

पुलवामा बालाकोट तथ्य व्याख्यान

CD

24964
...

‘पुलवामा- बालाकोट’चे सत्य जनतेसमोर यावे
माजी राज्यपाल सत्यपाल मलिकःऑनलाईन साधला संवाद
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २१ : ‘पुलवामा- बालाकोट हल्ल्याचे सत्य जनतेसमोर येण्यासाठी लोक चळवळ निर्माण व्हावी’, अशी अपेक्षा माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी आज येथे व्यक्त केली. लोकजागर कोल्हापूरतर्फे आयोजित ‘पुलवामा-बालाकोट : काही तथ्यं आणि काही प्रश्‍न’ विषयावर ते बोलत होते. प्रकृती ठीक नसल्याने त्यांनी केवळ चार मिनिटे ऑनलाईन संवाद साधला. लेखक फिरोज मिठीबोरवाला यांनी चित्रफितीसह या प्रकरणात नक्की काय घडले, याचा सविस्तरपणे ऊहापोह केला. राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवनात व्याख्यान ऐकण्यासाठी नागरिकांची गर्दी होती.
श्री. मलिक म्हणाले, ‘पुलवामा-बालाकोट प्रकरणात अनेक प्रश्‍न अनुत्तरीत आहेत. त्याची उत्तरे मिळविण्यासाठी जनतेने आग्रह धरायला हवा. त्यातील वास्तव समोर आल्यानंतर त्यांना देशातील वस्तुस्थितीचे दर्शन घडेल. त्यासाठी त्यांनी या विषयासंदर्भात सातत्याने सरकारकडे प्रश्‍न विचारायला हवेत.’
श्री. मिठीबोरवाला म्हणाले, ‘राजनाथसिंह पुलवामा हल्ल्ल्यातील मूळ प्रश्नांची उत्तरे का देत नाहीत? सीआरपीएफ व एमएचए या दोन्ही सरकारी संस्थांची माहिती विसंगत आहे. मीडियाने जमिनीवर जाऊन काम न केल्याने, जी माहिती मिळेल, ती प्रसारित केली. अर्णब गोस्वामी यांना काही गोष्टींची माहिती आधीच कशी मिळते, हाही संशोधनाचा विषय आहे. पुलवामा-बालाकोट हल्ल्यामुळे भाजपच्या मतांत वाढ झाली, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, हल्ल्याचे सत्य समोर आल्यास सत्ता जाण्याची भाजपला भीती आहे. ममता बॅनर्जी, राज ठाकरे यांच्यासह अनेकांनी महत्त्वाची वक्तव्ये केली आहेत. मलिक यांनी सरकारच्या दुर्लक्षामुळे हा हल्ला झाल्याचे म्हटले आहे.’ या वेळी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे, निवृत्त लेफ्टनंट कर्नल सी. जे. रानडे उपस्थित होते.
................

सत्य समोर येण्यासाठी डॉक्युमेंटरी
‘बालाकोटच्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये तीनशे दहशतवादी ठार झाले. त्याचवेळी सरकारने निवडणुकीत तीनशे जागा निवडून येण्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये बांधला होता. त्यामुळे पुलवामा-बालाकोट प्रकरणाचे सत्य समोर येण्यासाठी आम्ही डॉक्युमेंटरी बनवत आहोत. गोदी मीडियाची पोलखोल करणार असून, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या संदर्भातील सत्य समोर आणले जाईल’, असे मिठीबोरवाला यांनी सांगितले. २०२४ च्या निवडणुकीसाठी राम मंदिर ‘टार्गेट’ करण्यात आले आहे, असेही ते म्हणाले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

M Phil Professors : १४२१ प्राध्यापकांना मिळाला दिलासा! एम. फिल धारक प्राध्यापकांना अखेर नेट/सेटमधून सूट

Latest Maharashtra News Live Updates: किमान शिक्षकांवर तरी अशी वेळ येऊ नये, हे सरकार विसरतंय का? - विजय वडेट्टीवार

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Pune News : तीन वर्षात टाकली केवळ ९ किलोमीटरचीच सांडपाणी वाहिनी; प्रशासनाने टोचले ठेकेदाराचे कान

Monsoon Session: तुकडेबंदी कायदा रद्द! पुढे कशी असेल कार्यप्रणाली? 'त्या' जमिनींना नियमातून वगळले

SCROLL FOR NEXT