कोल्हापूर

कोपार्डे ( ता.शाहूवाडी ) येथे विद्युत धक्क्याने सख्या भावांचा मृत्यू

CD

02606
कोपार्डेत सख्ख्या भावांचा
विजेच्या धक्क्याने मृत्यू
खांबावरून आधार तारेत प्रवाह उतरला
सकाळ वृत्तसेवा
शाहूवाडी, ता. ३ : भात पिकाची रोप लावण केलेल्या शेतात तणनाशक व खत घालण्यास गेलेल्या सुहास कृष्णा पाटील (वय ३६) व त्याचा सख्खा लहान भाऊ स्वप्नील (३१, दोघे रा. कोपार्डे, ता. शाहूवाडी) यांचा वीज तारेचा धक्का बसून जागीच मृत्यू झाला. आज दुपारी तीनच्या दरम्यान ही घटना घडली. कष्टाळू व कर्त्या भावांचा असा अचानक मृत्यू झाल्याने पाटील कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
सुहास व स्वप्नील शेती करत होते. शेतीला जोडधंदा म्हणून दोघे गावाशेजारील येळाणे हद्दीतील चनवाड फाटा येथे गाड्या धुण्यासाठीचे सर्व्हिंसिंग सेंटरही चालवत होते. दोघेही आज दुपारी दोनच्या सुमारास जेवण झाल्यानंतर भात लावण केलेल्या शेतात तणनाशक व खत घालण्यासाठी वडिलांबरोबर गेले. दोघे तणनाशक व खत घालत होते. त्यावेळी वडिलांनी जनावरांना वैरण काढली. त्यानंतर ते भारा घेऊन घरी आले. पाठीमागे दोघे भाऊ भात शेतात काम करत होते. त्यावेळी नदीकडील बाजूस शेतपंपासाठी असणाऱ्या वीज खांबाच्या आधारासाठी लावलेल्या तारेमधून वाहत असलेल्या वीज प्रवाहाचा धक्का मोठा भाऊ सुहास याला बसला. या धक्‍क्याने सुहास धडपडत खाली कोसळला. भाऊ कोसळल्याचे पाहून स्वप्नीलने त्याला पकडले. त्यामुळे त्यालाही विजेचा धक्का बसला. त्यात दोघांचाही जागीच होरपळून मृत्यू झाला.
बराच वेळ झाला तरी दोन्ही मुले घरी का आली नाहीत म्हणून त्यांना बोलावण्यासाठी वडील कृष्णा पुन्हा शेतात गेले. त्यावेळी वीज खांबाशेजारी दोन्ही मुलगे निपचित पडल्याचे दिसले. वीज तारेच्‍या धक्‍क्‍याने दोघांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज बांधून ते माघारी फिरले. आरडाओरडा करतच ते गावात आले आणि गावकऱ्यांना झाला प्रकार सांगितला. तेव्हा ग्रामस्थांनी महावितरणला कळविले व घटनास्थळाकडे धाव घेतली. मनमिळावू व कष्टाळू सख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती. सुहास व स्वप्नील दोघेही विवाहित आहेत. सुहास याला एक मुलगी आहे. घटनास्थळी महावितरणचे अधिकारी व पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला. मलकापूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.

चौकट
माणसं का आली आहेत?
कृष्णा पाटील सुहासची मुलगी व मुलाला घेऊन घराच्या दरवाजाशेजारी बसले होते. त्यावेळी ती लहान मुले त्यांना माणसं का आली आहेत. मामा, पप्पा कुठायेत असे विचारत होती. त्यांचे ते बोबडे बोल ऐकूण आजोबांसह उपस्थितांचे डोळे पाणवत होते.
००००००००००००००००
फोटो - मयत सुहास व स्वप्नील पाटील
(जॅकेट घातलेला स्वप्नील)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: जसप्रीत बुमराहला IND vs PAK सामन्यात खेळवलं नाही तरी चालेल! सुनील गावस्कर यांना नेमकं म्हणायचंय तरी काय?

Royal Enfield Hunter 350: जीएसटी घटल्यानंतर बुलेटची किंमत किती? सगळ्या मॉडेल्सच्या प्राईज जाणून घ्या

Bin Lagnachi Goshta : बॉलिवूडकरांनी केलं 'बिन लग्नाची गोष्ट’चे कौतुक; सिनेमाची होतेय चर्चा

Latest Marathi News Updates : वसईच्या गिरीराज कॉम्प्लेक्समधील कंपनीला भीषण आग

Shirurkasar Flood: महापुरानंतर बेपत्ता; शिरूरकासार तालुक्यातील ६९ वर्षीय नागरिकाचा चौथ्या दिवशीही काहीसा ठावठिकाणा नाही

SCROLL FOR NEXT