कोल्हापूर

लोककलेला शासन दरबारी मदत मिळावी

CD

00796
नृसिंहवाडी : दत्त वाचनलयातर्फे आयोजित साहित्यातील लोकरंग या कार्यक्रमात सादरीकरण करताना डॉ. भावार्थ देखणे व डॉ. पूजा देखणे.
---------------
लोककलेला मदत मिळावी
डॉ. भावार्थ देखणे ः नृसिंहवाडीत साहित्यातील लोकरंग कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
नृसिंहवाडी, ता. २५ ः मराठी लोकसाहित्यातून महाराष्ट्राचे विश्वरुपदर्शन घडते. महाराष्ट्राचे मोठेपण लोकसाहित्यानेच पुढे आणले आहे. समतेचा आद्यप्रवाह संतांनीच निर्माण केला आहे. जसे संतांनी लोकसाहित्याला परिपूर्ण केले, तसे आधुनिक साहित्यिकांनीही योगदान दिले आहे. लोकसाहित्यातील कलांमध्ये आदानप्रदान झाल्यानेच ते अधिक समृद्ध झाले आहेत. त्यामुळे शासन दरबारी लोककलेला मदत मिळणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीचे सचिव डॉ. भावार्थ देखणे यांनी केले.
नृसिंहवाडी येथे दत्त सार्वजनिक वाचनालयातर्फे आयोजित साहित्यातील लोकरंग या कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांनी ओवीपासून ते पोवाड्यापर्यंत अनेक लोकसाहित्याच्या गीतांची मैफिल सादर केली. दत्त देवस्थानचे अध्यक्ष संतोष खोंबारे यांची उपस्थिती होती.
डॉ. देखणे म्हणाले, ''मानवी समाजाला लोकसाहित्यामुळे जीवनाची खरी दिशा मिळाली आहे. ओवीतून आपला समाज जागा व्हायचा, तर पोवाड्यामुळे समाज जागता रहायचा. आपली संस्कृती त्यागप्रधान आहे. समाजाला त्यागाची सवय लागावी म्हणून लोककलेने विश्वात्मक दान मागितले आहे. संतांच्या योगदानामुळे लोकसाहित्यात आध्यात्मिक मूल्यांचे दर्शन होते. पठ्ठे बापूराव यांची लावणी समाजाला दिशा देणारी ठरली तर लोकशाहिर आण्णाभाऊ साठेंची लावणी संयुक्त महाराष्ट्राचा महामंत्र बनली.’
डॉ. पूजा देखणे यांनी लोकसाहित्याचे विविध पदर उलगडत विविध लोककलावंतांच्या आठवणी जागवल्या. ऋषिकेश पुजारी, प्रसन्न भुरे यांनी साथसंगत केली. प्रारंभी डॉ. देखणे यांचा आळंदी संस्थानच्या विश्वस्तपदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार केला. वाचनालयाचे अध्यक्ष बाळासाहेब रुक्के पुजारी, उपसरपंच अमोल विभुते, रत्नाकर कुलकर्णी, डॉ. दिनेश फडणीस, योगेश मावळणकर, महेश पुजारी, वैभव पुजारी आदी उपस्थित होते. प्रास्तविक डॉ. मुकुंद पुजारी यांनी केले. स्वागत दर्शन वडेर यांनी केले.
---------------------
लोककलावंतांचे शासन दरबारी गाऱ्हाणं
कार्यक्रम समाप्तीवेळी डॉ. भावार्थ देखणे यांनी लोककलेला जिवंत ठेवणाऱ्या लोक कलावंतांसाठी गाऱ्हाणे सादर केले. ग्रामीण भागात विखुरलेल्या कलावंतांना समाजात प्रतिष्ठेचं स्थान मिळावे, यासाठी शासनाने आवश्यक ती पावलं उचलावीत, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: भारताविरुद्ध पाकिस्तानने टॉस जिंकला, प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल; हस्तांदोलन झालं की नाही?

पूरग्रस्तांसाठी ५ रुपये मागितले तर..., शेतकऱ्यांकडून वसुलीच्या टीकेवर मुख्यमंत्री फडणवीस कडाडले; कारखान्यांना इशारा

Latest Marathi News Live Update: राज ठाकरे मातोश्रीवर दाखल!

Raju Shetty: राज्य सरकार दलाली करतंय का: राजू शेट्टी

महावितरणचा दरवाढीचा शॉक! वीज होणार महाग, प्रति युनिट 'इतके' पैसे द्यावे लागणार जास्त

SCROLL FOR NEXT