Jyotiba Temple esakal
कोल्हापूर

Jyotiba Temple : दख्खनचा राजा जोतिबा मंदिरात 80 किलो चांदीचा वापर; गाभाऱ्यासाठी 65 लाख रुपये खर्च

मुख्य मंदिरात ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’चा जयघोष करण्यात आला.

सकाळ डिजिटल टीम

हा गाभारा भिंतीची कलाकुसर करण्यासाठी ८० किलो चांदीचा वापर करण्यात आला आहे. यासाठी सुमारे ६५ लाख रुपये खर्च आला आहे.

जोतिबा डोंगर : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या (Jyotiba Temple) मुख्य मंदिरातील पितळी उंबऱ्याच्या बाजूला असणाऱ्या चांदीच्या गाभारा भिंतीचा लोकार्पण सोहळा श्रींचे मुख्य पुजारी यांच्या हस्ते झाला. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे (Collector Amol Yedge), प्रांताधिकारी समीर शिंगटे, अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, देवस्थानचे सचिव शुशांत बनसोडे, तहसीलदार माधवी शिंदे प्रमुख उपस्थित होते.

या सोहळ्यावेळी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. मुख्य मंदिरात ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’चा जयघोष करण्यात आला. गुलाल, पुष्पवृष्‍ठी‍ व भव्य आतषबाजी करण्यात आली. या गाभारा भिंतीची कलाकुसर करण्यासाठी ८० किलो चांदीचा वापर करण्यात आला आहे. यासाठी सुमारे ६५ लाख रुपये खर्च आला असून, हा सर्व खर्च जोतिबा ग्रामस्थ, पुजारी, व्यापारी वर्ग यांच्या देणगीतून करण्यात आला आहे.

यासाठी कोणत्याही भाविकाकडून देणगी स्वीकारलेली नाही. या चांदीच्या कलाकुसरीमुळे आता जोतिबाच्या मंदिराला झळाळी आली असून, मंदिराला देखणे स्वरूप प्राप्त झाले आहे. या कामाचा लोकार्पण सोहळा संपूर्ण गावाने एकत्र येऊन साजरा केला. गाभारा भिंतीला पूर्वीचे मूळ दगडी स्वरूप आहे. हुबेहूब त्याला अनुसरून चांदीची कलाकुसर कारागिरांनी केली आहे. दगडी कमानीतील देव-देवता, मारुती, गरुड, लक्ष्मी, विष्णू यांची चित्रे हुबेहूब आकर्षक करण्याचा प्रयत्न केला आहे.

भिंतीत लहान ३२ दिवळ्या आहेत. त्याही सुंदर, देखण्या केल्या आहेत. आज मंदिरात रुद्राभिषेक, सर्व देवदेवतांना वस्त्र अर्पण सोहळा झाला. लोकार्पण सोहळ्यावेळी देवस्थानचे अधीक्षक धैर्यशील तिवले, सहायक सचिव महादेव दिंडे, सिंधिया देवस्थानचे अधीकक्ष अजित झुगर, फौजदार मनोज कदम, मंडल अधिकारी वासंती पाटील, तलाठी रमेश वळीवडेकर, ग्रामविकास अधिकारी जयसिंग बीडकर, गावातील तरुण मंडळे, ग्रामस्थ, पुजारी, भाविक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kapil Sibal on Supreme Court: सर्वोच्च न्यायालयावरच प्रश्नचिन्ह! कपिल सिब्बल स्पष्टच बोलले; "आता कोर्टात जाण्यात अर्थ नाही, विश्वास उडाला!"

Maharashtra Live News : अभिजीत दिपकेंच्या आजीचे अंत्यसंस्कार थांबवले; आईंचा दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप

YCM Hospital Incident : धक्कादायक ! पिंपरी-चिंचवडमध्ये धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण रस्त्यावर पडला; वायसीएम रुग्णालयातील प्रकार, VIDEO VIRAL

Navratri Festival : आदिमायेच्या उत्सवाला प्रारंभ;घटस्थापनेसाठी दुपारी दीड वाजेपर्यंत मुहूर्त

Tuljabhavani Temple: तुळजापूरला नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण ;तुळजाभवानी मातेच्या मंदिरात आज घटस्थापना

SCROLL FOR NEXT