कोल्हापूर

जपानमध्ये दुमदुमला शिवरायांचा जयजयकार

CD

27512
फुनाबोरी टॉवर हॉल सांस्कृतिक भवन, टोकियो ः भारत कल्चरल सोसायटी, जपान या संस्थेतर्फे आयोजित शिवजयंतीच्या कार्यक्रमातील एक क्षण.

जपानमध्ये दुमदुमला शिवरायांचा जयजयकार
पुणे, ता. २७ ः छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जपानच्या टोकियोमध्ये शिवगर्जना दुमदुमली. तेथील भारत कल्चरल सोसायटीतर्फे शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सुमारे ८०० भारतीय आणि १०० जपानी लोक शिवरायांना वंदन करण्यासाठी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
शिवरायांचा इतिहास आणि पराक्रम सर्वांना समजावा, म्हणून संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन हिंदी, इंग्रजी आणि जपानी भाषेमध्ये केले होते. लेझीम, ढोल-ताशांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पालखीमधून मिरवणूक काढण्यात आली. योकोहामा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ‘पंढरीची वारी’च्या धर्तीवर पालखी मिरवणूक काढली. कार्यक्रमात गणेशवंदना, शिवरायांच्या आयुष्यातील घटनांवर नाटक, गीत आणि नृत्ये सादर केली. योकोहामा मंडळाने ‘पावनखिंड’ नाटक सादर केले. महाराष्ट्राची परंपरा सांगणाऱ्या ‘गोंधळ’ नृत्य व लेझीम प्रस्तुतीने आणि जपानी कलाकारांनी शिवरायांवर आधारित गाण्यावर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आधारित प्रश्नमंजूषेमधील विजेत्यांचा पारितोषिक आणि प्रशस्तिपत्रे देऊन गौरव करण्यात आला.
जपानमधील भारतीय दूतावासाचे उपप्रमुख मयांक जोशी तसेच रोहन अग्रवाल, सुनील कुलकर्णी, योगेंद्र पुराणिक, जगमोहन चंद्रानी, निरंजन गाडगीळ, माकोतो यामाशिता आदी उपस्थित होते. हिंदू स्वयंसेवक संघ, जपान आणि शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय परिवार या संस्थांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे हिंदी-इंग्रजी सूत्रसंचालन विकास रंजन आणि अवंतिका चौधरी यांनी तर जपानी सूत्रसंचालन गौरी शेंबेकर यांनी केले.
रायगडाहून आणलेली शिवज्योत
रायगडाहून जपानला आणलेली ‘शिवज्योत मशाल’ या वर्षीच्या शिवजयंतीचे वैशिष्ट्य ठरली. महाराष्ट्रात सर्वत्र पारंपरिक शिवजयंती साजरी करत असताना अनेक संस्था आसपासच्या गडांवरून किंवा किल्ल्यांवरून मशाल घेऊन येतात. हीच पद्धत अवलंबून भारत कल्चरल सोसायटीने रायगड येथील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी येथून विधिवत पूजा करून मशाल जपानला आणली. यासाठी संस्थेचे संस्थापक-सदस्य संदीप गुंडप यांनी रायगडाला भेट दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT