कोल्हापूर

प्रकल्प रद्द होईपर्यंत उपोषणाचा निर्धार

CD

प्रकल्प रद्द होईपर्यंत
उपोषणाचा निर्धार
शाहूनगर, ता. ७ ः कौलव (ता. राधानगरी) येथे होणाऱ्या नियोजित एमआयडीसी प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांनी २४ जूनपासून सुरू केलेले बेमुदत साखळी उपोषण रविवारी चौदाव्या दिवशीही सुरूच होते. जोपर्यंत शासन हा प्रकल्प रद्द करत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.
गायरानातील ४० एकर क्षेत्रात एमआयडीसी सुरू करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. त्यासाठी सर्व्हेही झाला असून, ग्रामस्थांना व ग्रामपंचायतला विश्वासात न घेता शासनाने काही जमिनींचे संपादनही केले आहे. एमआयडीसीला स्थानिकांचा विरोध असतानाही लोकभावनेचा विचार न करता शासनाने हा प्रकल्प ग्रामस्थांच्या माथी लादण्याचा प्रयत्न केल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले आहे. प्रकल्प रद्द होईपर्यंत उपोषण सुरूच राहील. शासनाने आंदोलनाची दखल न घेतल्यास नियोजित एमआयडीसी प्रकल्पाविरोधातील लढा आणखी तीव्र करू, असे बाबूराव खडके यांनी सांगितले. यावेळी धोंडिराम पाटील, साताप्पा पाटील, भीमराव पाटील, महेश पाटील, पांडुरंग पाटील, मधुकर पाटील, कृष्णात पाटील आदी उपस्थित होते.
...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lonikand ST Bus Attack Video : लोणीकंदला भररस्त्यात एसटी बसवर हल्ला! लोखंडी रॉडने काच फोडली, दगडही फेकले; प्रवाशांची आरडाओरड, व्हिडिओ व्हायरल

राजकारण, क्रिकेट आणि मराठी अस्मिता... एका वक्तव्याने पेटलेला वाद; बाळासाहेबांनी सचिनला दिलेल्या ताकीदीची गोष्ट आजही चर्चेत

QR कोडचा शोध कसा लागला? एका कार कंपनीतून सुरू झालेला डिजिटल प्रवास, जाणून घ्या...

पोकळ धमक्या देणारा बांगलादेश, आता ICC चे तळवे चाटू लागला! शेवटचा प्रयत्न म्हणून पाठवले पत्र; म्हणतात,आम्हाला न्याय हवाय...

Miraj Elections : अर्ज भरले, आता माघारीचा डाव! मिरज तालुक्यात नेत्यांची जोरदार मोर्चेबांधणी

SCROLL FOR NEXT