कोल्हापूर

बाजूपट्ट्यांवर गवत, गंज्या, शेणाचे ढीग

CD

3163, 3162
सेनापती कापशी : मुख्य राज्यमार्गाच्या बाजूपट्ट्यांवर वाढलेले गवत शेतकरी कापून नेतात. दुसऱ्या छायाचित्रात कापशी-हमिदवाडा मार्गावर रस्त्याकडेला असलेले शेणाचे ढीग. (छायाचित्र : साताप्पा चव्हाण, बेनिक्रे)
.........
बाजूपट्ट्यांवर गवत, गंज्या, शेणाचे ढीग

सेनापती कापशी परिसरातील चित्र : अरुंद रस्त्यांमुळे अपघातांना निमंत्रण

सकाळ वृत्तसेवा
सेनापती कापशी, ता. २४ : वाहतूक निर्धोक होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांचे रुंदीकरण केले खरे. मात्र, रस्त्याच्या बाजूपट्ट्यांवर उन्हाळ्यात ट्रॅक्टर आणि इतर वाहने उभी करायची, शेण टाकून उकिरडे करायचे. असा परिसरातील रस्त्यांचा वापर होत आहे. त्यामुळे रस्त्याच्या रुंदीकरणाचा उपयोग काय? असे म्हणण्याची वेळ आली आहे. अरुंद रस्त्यांमुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे.
परिसरातील कापशीपासून मुरगूड, गारगोटी, गडहिंग्लज, निपाणी हे मुख्य रस्ते आणि परिसरातील गावांना जोडणारे लहान रस्ते यामुळे आणखी अरुंद झाले आहेत. या मार्गांवर वाहतुकीची मोठी वर्दळ असते. परिसरातील लहान-मोठे रस्ते बाजूपट्ट्यावर उभी केलेली वाहने, शेणाचे उकिरडे, गवताच्या गंज्यांनी व्यापले आहेत. उरलेल्या ठिकाणी पाच ते सात फूट उंचीचे गवत वाढले आहे. त्यामुळे रस्ते अरुंद बनले आहेत. अनेक ठिकाणी वाहतुकीला अडथळा होतो. दोन अवजड वाहने जाऊ शकणार नाहीत, अशी रस्त्यांची स्थिती आहे. तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाने गांभीर्याने घेतलेले नाही. काही काही ठिकाणी शेतकऱ्यांनी रस्त्यात अतिक्रमण केले आहे. बाजूपट्ट्यांवर गवत इतके वाढले आहे की, शेतकरी ते बिनधास्तपणे कापून जनावरांना घालत आहेत. रस्त्याकडेला शेण टाकलेल्या ठिकाणी गटारी गायब झाल्या आहेत. त्यामुळे शेतातील पाणी थेट रस्त्यावरून वाहत आहे. यामुळे रस्त्यात मोठे खड्डे पडले तरी याचे कोणालाही देणे घेणे नाही. या सर्व गोष्टींचा विचार करता सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने याप्रश्नी लक्ष घालून अतिक्रमणे दूर करून बाजूपट्ट्या प्रशस्त कराव्यात, अशी मागणी वाहनधारक व नागरिकांतून होत आहे.
..........
कोट...
शेतीकामासाठी शेतातून मुख्य रस्त्यावर ट्रॅक्टर येण्यासाठी शेतकऱ्यांनी गटारीवर माती, मुरूम टाकले जाते. संबंधितांनी हे पावसाळ्यापूर्वी काढून घेणे गरजेचे होते. मात्र, ते तसेच ठेवल्याने अनेक ठिकाणी गटारीतील पाणी थेट रस्त्यावरून वाहत आहे. खड्ड्यात मुरूम टाकरून गटारी पूर्ववत करून रस्त्यावर येणारे पाणी थांबविणार आहोत.
- एस. एल. पवार, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pankaja Munde Dasara Melava: भगवानगडावरील पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात वाल्मिक कराडचे पोस्टर, बीडचं राजकारण तापणार!

Dussehra Tradition: रावण-मेघनाथाला पळवून पळवून ठार केले; १७३ वर्षांची परंपरा असलेला UP तील अनोखा दसरा

Dussehra Melava 2025 Live Update : काही जणांना आता ओबीसीतून आरक्षण हवं आहे, हे चुकीचं - गोपीनाथ मुंडे

पैसा बोलता है! देशात महाराष्ट्र अन् शहरांमध्ये पुणे, भ्रष्टाचारात आघाडीवर; NCRBच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड

Gold Shopping: दसऱ्याच्या दिवशी सोनं खरेदी केल्यास काय होते? जाणून घ्या या परंपरेमागील गुपित!

SCROLL FOR NEXT