कोल्हापूर

आंबेओहळ प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न कायम

CD

उत्तूर - आंबेओहळ प्रकल्पावर आंदोलन करताना प्रकल्पग्रस्त.(संग्रहित).
.....
आंबेओहळ प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न कायम

पाणीसाठा तरी प्रशासनाचे दुर्लक्ष, प्रकल्पग्रस्त आक्रमक

सकाळ वृत्तसेवा
उत्तूर, ता. ४ ः उत्तूर परिसरातील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी उत्तूरनजीक असलेला आंबेओहळ प्रकल्प पूर्ण झाला. प्रकल्पात २०२१ मध्ये पाणी साठवण्यात आले. मात्र, प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत.
प्रश्नांची तड न लागल्याने तीन वर्षांपासून शांत असलेले प्रकल्पग्रस्त आता मात्र आक्रमक बनले आहेत. सामूहिक जलसमाधीसारखे आंदोलन करण्याच्या तयारीत उत्तूरसह आरदाळ, हालेवाडी, करपेवाडी, होन्याळी या गावांतील प्रकल्पग्रस्त आहेत. प्रकल्पातील शेवटच्या धरणग्रस्तांचे पुनर्वसन झाल्याशिवाय प्रकल्पात पाण्याचा थेंबही अडवणार नाही, ही घोषणा प्रत्येक निवडणुकीत सर्वच पक्षांनी केली. प्रकल्पाचे १०० टक्के काम पूर्ण करून जलसिंचनसाठी वापरण्यात आले. पुनर्वसन मात्र ५० टक्क्यांवर गेलेच नाही, असा प्रकल्पग्रस्तांचा दावा आहे.
...
दृष्टिक्षेपात
- ज्या धरणग्रस्तांना जमीन मिळाली, ती राहत्या घरापासून आठ किलोमीटरच्या पुढे आहे, अशा दोनशे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीनुसार घरबांधणीसाठी भूखंड मिळणे बाकी आहेत.
- पुनर्वसन जमीन मिळाल्या तरी त्या जमिनीवर भोगवट्याचे रक्कम म्हणून लाखो रुपयाचा बोजा बेकायदेशीर चढवला आहे.
- अद्याप जमीन किंवा पॅकेज मिळालेले नाहीत असे ८० शेतकरी आहेत.
- कुटुंब संख्येच्या तुलनेत संकलन रजिस्टरप्रमाणे पाच ते सात एकर जमीन देय असताना पुनर्वसन अधिकाऱ्यांकडून चार एकरपेक्षा जास्त जमीन देता येत नाही असा समज.
- संकलन दुरुस्ती करून काही शेतकऱ्यांना जमिनी वाढवून मिळणार आहेत, असे शेतकरी १५ ते २० आहेत.
- स्वेच्छा पुनर्वसन घ्या. भरघोस सानुग्रह अनुदान देतो म्हणून फसवणूक झालेले ३०० शेतकरी आहेत.
.....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Election Results: पती-पत्नीचा दणदणीत विजय; पुण्यातल्या 'या' प्रभागाची राज्यात होती चर्चा

Kolhapur Election Party Wise Winners : कोल्हापूर महानगरपालिका पक्षनिहाय विजयी उमेदवार लिस्ट, जाणून घ्या पक्षीय बलाबल

Maharashtra Municipal Election 2026 Results Live : अमरावतीत अंतिम निकाल नाही; तरीही भाजप-राष्ट्रवादीच्या युतीची चर्चा; सहा वाजेपर्यंत कुणाच्या किती जागा?

MBMC Results: मीरा-भाईंदरमध्ये भाजप मोठ्या फरकाने सत्तेत येणार! इतर पक्षांना मोठा फटका; जाणून घ्या विजयी उमेदवारांची यादी

ना राधा पाटील ना दीपाली सय्यद; 'या' सदस्याला मिळालीत सगळ्यात जास्त मतं; पाहा 'बिग बॉस मराठी ६'चा व्होटिंग ट्रेंड

SCROLL FOR NEXT