Warana Milk Union Vinay Kore esakal
कोल्हापूर

मुंबई मेट्रो स्टेशनवर वारणा दुधाची होणार विक्री; दररोज 6 लाखांहून अधिक प्रवासी-ग्राहकांपर्यंत पोहोचणार दूध!

वारणा सहकारी दूध उत्पादक संघाच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त सभासदांना दरवर्षीप्रमाणे तूप देण्यात येणार असल्याची माहिती आमदार डॉ. विनय कोरे यांनी दिली.

सकाळ डिजिटल टीम

वारणानगर : मिल्क स्टॉलच्या माध्यमातून मेट्रो लाईनवर दररोज प्रवास करणा-या ६ लाखांहून अधिक प्रवासी व ग्राहकांपर्यंत पोहोचणार असल्याचे संघाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे (Vinay Kore) यांनी सांगितले.

तात्यासाहेब कोरेनगर येथील वारणा दूध संघाचे दूध व दुग्धजन्य पदार्थ मुंबई मेट्रोच्या (Mumbai Metro) विविध स्टेशनवर मिळतील. मुंबई मेट्रो लाईनवर वारणा दूध संघाचे घाटकोपर, साकीनाका, मरोळनाका, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे व डी.एन.नगर या मेट्रो स्टेशनवर संघाचे मिल्क स्टॉल आहेत. स्टॉलना ग्राहकांचा मोठा प्रतिसाद आहे.

मुंबई मेट्रो स्टेशनवरील (Mumbai Metro Station) अंधेरी मेट्रो स्टेशनवर वारणा दूध संघाचे (Warana Milk Union) नवीन मिल्क स्टॉलचे उद्घाटन व विक्री प्रारंभ संघाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांच्याहस्ते झाला. आगामी अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशनवर व इतर मेट्रो स्टेशनवर वारणा मिल्क स्टॉल सुरू होईल. मागणीनुसार दुग्धपदार्थामध्ये आवश्यक बदल करून मुंबईतील बाजारात येतील. संघाकडील लस्सी, दही, पनीर, श्रीखंड, तूप या दुग्धपदार्थांबरोबरच सर्व दुग्धपदार्थांची मागणी वाढली आहे.

दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या प्रदेशनिहाय मागणीनुसार विविध स्टेशनवर विक्री केंद्रे सुरू करणार असल्याचे कार्यकारी मोहन येडूरकर यांनी सांगितले. मुंबई मेट्रो अधिकारी जयेश तडोसे, जनरल मॅनेजर रिटेल हेड कुमार पाटील, मुख्य अधिकारी सिव्हील आनंदराव पाटील, मुख्य अधिकारी इलेक्ट्रिक आणि मेटेनन्स् जयवंत पडते, मुख्य अधिकारी प्रशासन, इतर मेट्रोचे अधिकारी व संघाचे अधिकारी उपस्थित होते.

‘वारणा’तर्फे सभासदांना ४ मार्चपासून तूप भेट

वारणा सहकारी दूध उत्पादक संघाच्यावतीने महाशिवरात्रीनिमित्त सभासदांना दरवर्षीप्रमाणे तूप देण्यात येणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी दिली. ४ ते १६ मार्च दरम्यान प्राथमिक दूध संस्था, संघाची वितरण केंद्रे व वितरकांमार्फत सभासदांना तूप वाटप होईल, असेही त्यांनी सांगितले.

ज्या ‘अ’ वर्ग सभासदांनी शेअर पूर्ण केले आहेत व जे दूध संस्थांमार्फत संघास दूधपुरवठा करतात. अशा ‘अ’ वर्ग सभासदांना, ‘ब’ वर्ग संस्था सभासदांना व राज्यभरातील ‘क’ वर्ग ग्राहक सभासदांना दरवर्षी सवलतीत तूप भेट मिळते. कोल्हापूर व परिसरातील अ वर्ग व क वर्ग सभासदांचे तुपाचे स्टेशन रोड कोल्हापूर विक्री केंद्रातून ४ मार्चपासून वाटप होईल.

मुदतीत ज्यांना तूप घेता आले नाही त्यांना १६ मार्चला कोल्हापूर विक्री केंद्रातून तूप देण्याची व्यवस्था केली आहे. वरील कालावधीत ओळखपत्र अथवा अन्य कागदपत्राची झेराक्स दाखवून सवलतीतील तूप घेऊन जावे, असे आवाहन कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी केले. यावेळी संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव, अकौंटस मॅनेजर सुधीर कामेरीकर यांच्यासह संचालक मंडळ व अधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

Navi Mumbai : APMC मार्केटजवळ भीषण आग, १० पेक्षा जास्त ट्रक, टेम्पो जळून खाक

Bus-Car Accident : कोल्हापुरातून महालक्ष्मीचं दर्शन घेऊन परतताना भीषण अपघात; बस-कारच्या धडकेत चौघे ठार, एक जण जखमी

Panchang 7 July 2025: आजच्या दिवशी ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा किमान 108 जप करावा

SCROLL FOR NEXT