the topic of hatkanangale crime police arrested a crime person in kolhapur 
कोल्हापूर

कोल्हापूर : हातकणंगले खून प्रकरणाचा पोलिसांनी 24 तासांच्या आत लावला छडा; चौघांना अटक

अतुल मंडपे

हातकणंगले (कोल्हापूर) : कोरोची माळावरील चव्हाणटेकडी येथील शुभम कमलाकर खून प्रकरणाचा शिवाजीनगर पोलिसांनी 24 तासाच्या आत छडा लावला. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना पट्टणकोडोली येथून अटक केली. अटक केलेल्यांपैकी अनिल पांडव, सुनील पांडव, स्वप्नील कोळी, विरेश हिरेमठ (सर्व रा. हातकणंगले) अशी संबंधितांची नावे आहेत. पूर्ववैमनस्यातून खून केल्याची कबुली आरोपींनी यावेळी दिली. आरोपींना अटक करून हातकणंगले पोलिसांच्या  ताब्यात दिले.

मंगळवारी रात्रीच्या सुमारास कोरोचीच्या माळावर शुभम कमलाकर याचा काही अज्ञात मारेकर्‍यांनी निर्घुणपणे खून केला होता. या घटनेनंतर पोलिसांनी तपास गतिमान केला होता. विविध पोलिस पथकांच्या माध्यमातून मारेकऱ्यांचा शोध सुरू होता. शिवाजीनगर पोलिस पथकाने शुभमच्या मारेकऱ्यांना पट्टणकडोली येथून पकडले. त्यानंतर चारही आरोपींनी खून केल्याची कबुली दिली.

या कारवाईमध्ये शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रमोद मगर, रफिक पाथरवट, उदय पाटील, प्रशांत ओतारी, प्रकाश कांबळे, महेश पाटील, अविनाश भोसले, विजय माळवदे यांनी सहभाग घेतला. याबाबतची माहिती शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी दिली.
 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT