Torture minor girl in sangli miraj 
कोल्हापूर

धक्कादाय : मिरजेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; भावाला मारण्याची दिली धमकी

सकाळ वृत्तसेवा

मिरज - भावास मारहाण करण्याची धमकी देऊन शहरातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची तक्रार शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका 21 वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. फरहान युसुफ ढालाईत (वय 21) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, घटनेतील पीडित मुलगी ही सकाळी शाळेला निघाली असता संशयित तरुणाने तिचा मोटारसायकलवरून पाठलाग केला. तिला सक्तीने गाडीवर बसण्यास भाग पाडले.

तिला शहरातील एका हॉटेलच्या पिछाडीस असलेल्या खोलीत नेऊन तिला तुझ्या भावाला ठार मारेन अशी धमकी दिली. तिथेच तिला प्यायला पाणी दिले. हे पाणी प्यायल्यानंतर तिला कापडाच्या पट्टीने बांधण्यात आले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची तक्रार संबंधित मुलीने शहर पोलिसांत दिली आहे. पीडित मुलीची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी केवळ काही मिनिटांत संशयित तरुणास अटक केली. दरम्यान, या घटनेबाबत सायंकाळी उशिरापर्यंत पोलिस ठाण्याच्या आवारात पीडित तरुणी आणि संशयित तरुणाच्या बाजूच्या नातेवाईक आणि अन्य मंडळींची गर्दी झाली होती.  

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला लवकरात लवकर खेळवा, तो... रवी शास्त्री स्पष्ट इशारा; गावसकरांनी केलं मोठं भाष्य

Navi Mumbai News : पावसाच्या पाण्यात उतरला विद्युतप्रवाह, शॉक लागताच २ विद्यार्थीनी रस्त्यातच पडल्या; महापौर आणि MSEBचे एकमेकांकडे बोट

Fifa World Cup : हॅरी केनचा दुहेरी गोलांचा धमाका; इंग्लंडचा काँगोवर २-१ असा दमदार विजय

World Sports Journalists Day 2026: 2 जुलैलाच का साजरा केला जातो जागतिक 'क्रीडा पत्रकार दिन'? जाणून घ्या इतिहास

'बाल्कनीतून खाली उडी...' मंदार जाधवने सांगितला डिप्रेशनमधला थरकाप उडवणारा प्रसंग, म्हणाला 'काम नव्हतं म्हणून...'

SCROLL FOR NEXT