Tourists will come to Rankala, see turtles ... 
कोल्हापूर

रंकाळ्यावर पर्यटक येणार, कासव पाहणार... 

राजेंद्र पाटील

कोल्हापूर : ऐतिहासिक रंकाळा तलाव परिसरात रंगीत फुला-पानांची कासव प्रतिकृती साकारत आहे. इराणी खाणी जवळ निसर्ग व पक्षीनिरीक्षण केंद्राचे इमारतीसमोर ही कासव प्रतिकृती उभारली आहे. रंगीत पानाफुलांची झाडे वाढताच रंकाळ्यावर ही प्रतिकृती एक आकर्षक केंद्र ठरणार आहे. रंकाळ्यावर पर्यटकांचा ओघ वाढावा व रंकाळा पर्यटन केंद्र व्हावे या दृष्टीने माजी स्थायी समिती सभापती व विद्यमान नगरसेवक शारंगधर देशमुख व महापालिका प्रयत्न करत आहेत. 

दुर्लक्षित असलेल्या निसर्ग व पक्षीनिरीक्षण केंद्रासमोर असलेल्या रिकाम्या जागेत कासवाच्या प्रतिकृती आकारात सहा स्वतंत्र हेज केले आहेत. यामध्ये स्पायडर लिली, रोहियो, गुलाब, रातराणी, जास्वंद, हायड्रेंजिया, कॅनाइंडिका, मोगरा, कुफिया, युफोरबिया, एक्‍झोटा, कृष्ण कमळ, घाणेरी, पंपासग्रास, दुरांडा, मुसांडा, रिबनग्रास तगरा आदी रंगीबेरंगी फुलापानांची झाडे लावली आहेत. कासव प्रतिकृतीच्या चारी बाजूने पाथवे केला आहे. रंकाळा मॉर्निंग वॉकर्सना या पाथ वे वरून चालताना रंगीबिरंगी फुलापानांची कासव प्रतिकृती पाहण्याचा आनंद मिळणार आहे. 

केंद्र शासनाच्या अमृत हरित क्षेत्र विकास योजनेअंतर्गत रंकाळा परिसरात जैवविविधता व पर्यावरणाच्या संवर्धनासाठी गेल्यावर्षी शेकडो झाडे लावल्याने हिरवाई बहरली आहे. विविध पक्ष्यांच्या अधिवासाच्या दृष्टीने वड, पिंपळ, बकुळ, चिंच, कांचन आदी देशी वृक्षांची लागवड केली आहे. 

लोकांना निसर्गाच्या जवळ आणणारा, पर्यावरण संवर्धनाला मदत करणारा हा अमृत हरित विकास प्रकल्प असल्याचे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता अनुराधा वांडरे यांनी सांगितले. विरेश ढसाळ यांच्या साई समर्थ इरिगेटर्स अहमदनगर यांनी हा हरित प्रकल्प राबविला आहे.गार्डन डेव्हलपर सोहम बारटक्के यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत. 

अमृत हरित प्रकल्पामुळे ऐतिहासिक रंकाळा तलाव परिसरात हिरवाई बहरली आहे.रंकाळा परिसर आकर्षक पर्यटन केंद्र बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे. 
- शारंगधर देशमुख, नगरसेवक 


दृष्टिक्षेप 
- इराणी खाणी जवळ निसर्ग व पक्षीनिरीक्षण केंद्रसमोर उभारणी 
- रंकाळ्यावर पर्यटना वाढीसाठी प्रयोग 
- प्रतिकृती आकारात सहा स्वतंत्र हेज तयार 
- कासव प्रतिकृतीच्या चारी बाजूने पाथवे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विधानसभेनंतर महाराष्ट्रात १५ लाख नवमतदार वाढले, एकही आक्षेप नाही; बीएमसीत एकूण मतदार पोहोचले १ कोटीच्या वर

Nandurbar News : नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांची आदर्श कृती; जुळ्या मुलांचा सरकारी शाळेत प्रवेश, पाहा व्हिडिओ

Gold Price : महिनाभरात सोने १० हजार रुपयांनी महागले! भाव एक लाख १० हजारांच्या पुढे; जागतिक बाजारातील अस्थिरतेचा परिणाम

Latest Marathi News Updates : पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार महेश राखचा खून करून संशयितांचे मिरजेकडे पलायन

Pune News : इतिहासाचा मार्गदर्शक तारा अनंतात विलीन; ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

SCROLL FOR NEXT