kolhapur sakal
कोल्हापूर

हिंदुस्थान युनिलिव्हर च्या परवानगीमुळे कोल्हापुरात बंद

हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनी ने जिओ मार्ट ला खुल्या मार्केट साठी दिलेल्या परवानगी विरोधात आज कोल्हापुरातील संबंधित व्यापाऱ्यांनी बंद पाळून याला विरोध केला.

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनी ने जिओ मार्ट ला खुल्या मार्केट साठी दिलेल्या परवानगी विरोधात आज कोल्हापुरातील संबंधित व्यापाऱ्यांनी बंद पाळून याला विरोध केला.

ऑल इंडिया कन्झ्युमर प्रोडक्टस् डिस्ट्रीब्युटर्स फेडरेशनने आज भारतातील वितरकांचा व्यापार बंद पुकारला आहे. यामध्ये कोल्हापुरातील व्यापाऱ्यांनीही सहभाग घेतला, अशी माहिती कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीने देण्यात आली आहे.

कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या शिवाजीराव देसाई सभागृहात याबाबत ची सभा आज पार पडली. यावेळी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने या आंदोलनास आपला पाठींबा व्यक्त केला.

हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनी ने जिओ मार्ट ला खुल्या मार्केट साठी दिलेल्या परवानगीमुळे अधिकृत वितरकांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. वितरकांनी लाखो-करोडो ची पूंजी लावून कंपन्यांसाठी सेवा व्यवसाय करतात. त्या मोबदल्यात कंपन्या जर अशाप्रकारे त्यांना देशोधडीला लावण्याचे कार्य करत असतील तर हे निश्चितच अन्यायकारक आहे. महाराष्ट्रामध्ये जवळपास वीस हजारावर अधिकृत वितरक आणि त्यांच्यावर अवलंबून असणारे तीन लाखाच्यावर कामगार यांचे कुटुंब उध्वस्त होऊ घातली आहेत. याचा विरोध करण्यासाठी आज एक दिवसाचा लाक्षणिक बंद आम्ही पाळत आहोत अशी माहीती ऑल इंडिया कन्झ्युमर प्रोडक्टस् डिस्ट्रीब्युटर्स फेडरेशन व महाराष्ट्र कन्झ्युमर प्रोडक्टस् डिस्ट्रीब्युटर्स फेडरेशनचे अध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी येथे दिली.

कंपन्या मॉडर्न ट्रेडच्या नावाखाली मॉल्स आणि ई कॉमर्स ( वॉल मार्ट उडान, बुकर, डी मार्ट आणि तत्सम) कंपन्यांना भरघोस डिस्काउंट देतात, आणि वर्षानुवर्षे कंपनीची सेवा करणाऱ्या डिस्ट्रीब्युटर्स ला कमी मार्जिन देतात, ज्यामुळे एकाच मार्केटमध्ये एकाच प्रॉडक्टचे वेगवेगळे दर असल्यामुळे डिस्ट्रीब्युटर्स चे व्यवसायिक नुकसान होत आहे. आज एफएमसीजी सेक्टर हा शासनाच्या महसुला मध्ये फार मोठे योगदान देत आहे. त्याबदल्यात शासनाने त्याचे व त्याच्या व्यापाराचे संरक्षण करावे, एवढीच त्यांची माफक अपेक्षा व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

शासनाने याबाबतीत लक्ष घालून एका वस्तूचे सर्व ठिकाणी एकच दर असतील व त्यामध्ये तफावत असणार नाही, याबाबत लक्ष घालून सहकार्य करावे हीच मागणी आहे. त्या अनुषंगाने आजचा हा बंद आम्ही महाराष्ट्रभर पाळतोय. असेही जाहीर करण्यात आले. सर्व वितरकांनी आज संपूर्ण व्यवसाय बंद ठेवून व दंडावर काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला.

यावेळी ऑल इंडिया कन्झ्युमर प्रोडक्टस् डिस्ट्रीब्युटर्स फेडरेशन व महाराष्ट्र कन्झ्युमर प्रोडक्टस् डिस्ट्रीब्युटर्स फेडरेशनचे अध्यक्ष श्री. धैर्यशील पाटील, कोल्हापूर कन्झ्युमर प्रोडक्टस् डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशनचे अध्यक्ष व कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज चे संचालक प्रशांत शिंदे, महाराष्ट्र फेडरेशनचे खजानिस अतुल दोशी, झोन अध्यक्ष विजय नारायणपुरे, हिंदुस्थान युनिलिव्हरच्या वितरक निकीता पाटील व इतर वितरक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhoom News : धाराशिवच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण भरारी! हिवरड्याच्या पार्थसारथी मुंडेचे दिल्लीतील राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद

Akola Crime : अकोल्यातील दोन प्रसिद्ध डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल; रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाचे आदेश

Velhe News : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! निगडे बुद्रुक येथे शेतात १५ किलो पेक्षा अधिक वजनाचा बर्फाचा गोळा आकाशातून कोसळला; सुदैवाने शेतकरी बचावले

BJP National President Attack : 'देशात अस्थिरता निर्माण करण्याच्यामागे परकीय शक्तींचा हात'; 'इंडिया' आघाडी आणि केजरीवालांवर भाजपचा घणाघात

Karmad Accident : मशाल ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांना आयशरची धडक; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT