Traders Take Initiative For Lockdown In Ajara Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

आजऱ्यात लॉकडाऊनसाठी व्यापाऱ्यांनी घेतला पुढाकार, "या' तारखेपर्यंत राहणार शहर बंद

रणजित कालेकर

आजरा : शहरातील व्यापाऱ्यांनी आज तहसीलदार विकास अहिर यांच्याशी भेट घेऊन लॉकडाउनविषयी चर्चा केली. शहरात समूह संसर्ग वाढत असून, या पार्श्‍वभूमीवर शहरात लॉकडाउन केला जावा, अशी भूमिका मांडली. 1 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर असे 11 दिवस लॉकडाउन केला जाणार असून, प्रशासनाने सहकार्य करावे, असे व्यापारी प्रतिनिधींनी बैठकीत सांगितले. 
बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी होत असल्याने समूह संसर्गाचा धोका वाढला आहे. शहरात 150 च्या वर रुग्णांचा आकडा गेला असून, कोरोनाने मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढले आहे.

शहरातील व्यापाऱ्यांची रॅपिड अँटिजेन चाचणी प्रशासनाकडून केली जात असून, दहा व्यापाऱ्यांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. त्यामुळे शहरात लॉकडाउन व्हावे, अशी भूमिका व्यापारी प्रतिनिधींनी तहसील कार्यालयात झालेल्या चर्चेत मांडली.

व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष दिवाकर नलवडे, जनार्दन टोपले यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले, ""व्यापारी बाधित होण्याचे प्रमाण चिंताजनक असून, समूह संसर्ग होण्याचा धोका वाढला आहे. शहराबरोबर सर्व नागरिकांची सुरक्षितता धोक्‍यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन करणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्वच व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.''

तत्पूर्वी, येथील रवळनाथ मंदिरात व्यापारी असोसिएशनच्या प्रतिनिधींची बैठक झाली. तहसीलदार अहिर, सहायक पोलिस निरीक्षक बालाजी भांगे यांनी सहकार्य करणार असल्याचे या वेळी सांगितले. उपनगराध्यक्ष विलास नाईक, नगरसेवक संभाजी पाटील, महादेव टोपले, आप्पासाहेब तेरणी, यशवंत इंजल, नाथ देसाई, मनोज गुंजाटी यांच्यासह व्यापारी असोसिएशनचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

अकरा दिवस पेठ बंद 
व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे आजरा बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बाजारपेठ बंदपूर्वी ग्राहकांनी जीवनावश्‍यक वस्तू व आवश्‍यक साहित्याची खरेदी करावी, असे आवाहन व्यापारी असोसिएशनच्या प्रतिनिधींकडून करण्यात आले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विधानसभेनंतर महाराष्ट्रात १५ लाख नवमतदार वाढले, एकही आक्षेप नाही; बीएमसीत एकूण मतदार पोहोचले १ कोटीच्या वर

Nandurbar News : नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांची आदर्श कृती; जुळ्या मुलांचा सरकारी शाळेत प्रवेश, पाहा व्हिडिओ

Gold Price : महिनाभरात सोने १० हजार रुपयांनी महागले! भाव एक लाख १० हजारांच्या पुढे; जागतिक बाजारातील अस्थिरतेचा परिणाम

Latest Marathi News Updates : अंबाबाई देवीच्या दागिन्यांना झळाळी, पोलिस अधीक्षकांची मंदिर परिसराला भेट; सुरक्षिततेबाबत सूचना

Pune News : इतिहासाचा मार्गदर्शक तारा अनंतात विलीन; ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

SCROLL FOR NEXT