trafic trafic telefilm release helps to question of trafic in kolhapur 
कोल्हापूर

'ट्रॅफिक - ट्रॅफिक' ; राज्यातच नाही तर देशभरात होणार जनजागृती

संभाजी गंडमाळे

कोल्हापूर : वाहतूकीचे प्रश्‍न आणि रस्ता सुरक्षा याविषयावर प्रबोधनात्मक उपक्रमांबरोबरच विविध कृती कार्यक्रमांवर भर देणाऱ्या येथील संवेदना फाऊंडेशनच्या वतीने आज 'ट्रॅफिक - ट्रॅफिक' या टेलिफिल्मच्या शुटींगला प्रारंभ झाला. एकांकिकेतंनतर आता ही टेलिफिल्मही वाहतूकीच्या एकूणच प्रश्‍नांबाबत सर्वसामान्यांत मोठी जनजागृती करेल, असे गौरवोद्‌गार यावेळी ज्येष्ठ दिग्दर्शक पवन खेबूडकर यांनी काढले. 

दरम्यान, विश्‍वकर्मा पार्क परिसरात या टेलिफिल्मच्या शुटींगला प्रारंभ झाला असून विविध भाषांमध्ये त्याचे डबींगही केले जाणार आहे. त्यामुळे ही टेलिफिल्म केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात जनजागृतीचे काम करणार असल्याचे फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय कात्रे यांनी सांगितले. राष्ट्रीय रस्ते सुरक्षा मास अंतर्गत संस्थेतर्फे विविध कृती कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. विविध पोस्टर्स आणि स्टीकर्स संस्थेने तयार केली असून ती विविध ठिकाणी वितरित केली आहेत. 

रस्ते अपघातातील मृत्यूंचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी जनजागृती, शहरातील 54 किलोमीटर रस्त्यांवरील दुभाजकांवर रिफ्लेक्‍टर्स, शाळा-महाविद्यालयांत व्याख्याने आणि "ट्रॅफिक-ट्रॅफिक' एकांकिचे सादरीकरण आदी उपक्रमांवर यापूर्वीच संस्थेने भर दिला आहे. त्याचाच पुढचा टप्पा म्हणून टेलिफिल्म तयार केली जात आहे. संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. सुनिल पाटील यांनी स्वागत केले. सचिव डॉ. ऋषिकेश जाधव यांनी आभार मानले. खजानीस सुहास नाईक, विश्‍वस्त शिरीष पुजारी, टेलिफिल्मचे दिग्दर्शक उत्कर्ष जाधव आदी यावेळी उपस्थित होते. 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: ... तर महेंद्रसिंग धोनी CSK संघातील जागा अडवतोय! एबी डिव्हिलियर्स म्हणाला, निवड गुणवत्तेच्या आधारावर झाली पाहिजे

इराणच्या पेट्रोलपेक्षा भारतात चहा महाग! एक लीटर पेट्रोल अन् डिझेलचा दर वाचून बसेल धक्का

सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना पत्नीसह वर्षभर मोफत प्रवास! पण कुठे आणि कसा? परिवहनमंत्र्यांची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्हा परिषदेत अध्यक्ष-उपाध्यक्ष पदांची बिनविरोध निवड

Nashik IVF Centers : स्त्रीबीज तस्करीचे धागेदोरे नाशिकमध्ये! महापालिकेकडून १२ आयव्हीएफ सेंटर्सची तपासणी पूर्ण

SCROLL FOR NEXT