कोल्हापूर : कोरोनाबाधित रुग्णांवर यापुढे त्यांच्या घरातच उपचार करण्यासंदर्भात जिल्हा प्रशासन विचाराधीन आहे. ज्या बाधितांच्या घरी स्वतंत्र शौचालय आणि राहण्यासाठी स्वतंत्र खोली असेल, अशा रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर घरीच उपचार होतील. संबंधित रुग्णाच्या घरी जाऊन डॉक्टर औषधोपचार करतील, असे नियोजन जिल्हा प्रशासनाकडून केले जात आहे.
जिल्ह्यात दिवसेंदिवस बाधितांची संख्या वाढत आहे. वाढणाऱ्या रुग्णांवर नियोजनबद्ध उपचार करता यावेत, त्यांना हवा तसा व्यायाम करता यावा, डॉक्टरांनी दिलेल्या सूचनेनुसार भरपूर आणि सकस आहार घेऊन कोरोनाचा प्रतिबंध करता यावा, यासाठी शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार कोल्हापूर जिल्हा प्रशासनही तयारी करीत आहे.
जिल्ह्यात रोज २०० ते ३०० रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आता कोरोनाची उपचार घेणाऱ्यांची संख्या १७००च्या घरात गेली. जिल्ह्यात एकूण रुग्णांची नोंद ३०३९ वर गेली आहे. त्यामुळे एवढा मोठ्या प्रमाणात रुग्णांची देखभाल करण्यासाठी दवाखान्याऐवजी आता घरातच चांगली सेवा होऊ शकते. डॉक्टरांबरोबर घरचे लोकही अशा रुग्णांना वेळेत जेवण, आवश्यक औषधे, प्रतिकार शक्ती वाढवणारे पोषक आहार, फळे, दूध, अंडी देतील. रुग्ण लवकरात लवकर ठणठणीत बरा होण्यास त्यामुळे मदत होणार आहे. त्यामुळे ज्यांच्या घरी स्वतंत्र शौचालय आहे, राहण्यासाठी स्वतंत्र खोली आहे, घरातल्या लोकांसोबत जास्त संपर्क येणार नाही, अशा लोकांनी घरात राहूनच उपचार घेतले तर ते तत्काळ बरे होतील. घरी उपचार घेणाऱ्या रुग्णांवर एखादा दवाखान्याशी संपर्क ठेवावा लागणार आहे. तशी त्यांची कागदोपत्री नोंद ठेवली जाईल. याचे नेटके नियोजन जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, सीपीआर प्रशासन करीत आहेत.
हे पण वाचा - कोल्हापुरातील 'या' सोसायटीत बाधित आढळलाच तर त्याच्यावर घरीच संपूर्ण उपचाराची जबाबदारी...
कोरोना रुग्णांना घरीच उपचार घेता येतील. त्यांच्याकडे राहण्यासाठी स्वतंत्र खोली, स्वच्छतागृह असल्यास ते घरी राहून उपचार घेऊ शकतात. शासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातही आपण रुग्णांना घरीच उपचार देण्यासाठी नियोजन करीत आहोत.
- दौलत देसाई, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
संपादन - धनाजी सुर्वे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.