कोल्हापूर

कोल्हापूर: खोराटवाडी गावात घुसला टस्कर हत्ती

अशोक तोरस्कर

मानवी वस्तीत हत्ती आल्याने या परिसरात घबराट पसरली. वनविभागाचे कर्मचारी या हत्तीवर लक्ष ठेवून आहेत.

खोराटवाडी (कोल्हापूर): गावात आज सकाळी आठ वाजता टस्कर हत्ती घुसला. गावच्या कमानीतून हत्ती मारुती गल्लीतून मारुती मंदीर पर्यंत गेला. त्याठिकाणाहून परतून तो मासेवाडीच्या भुतोबा परिसराकडे गेला. मानवी वस्तीत हत्ती आल्याने या परिसरात घबराट पसरली. वनविभागाचे कर्मचारी या हत्तीवर लक्ष ठेवून आहेत.

पहिल्यांदा या परिसरात हत्तीचे आगमण झाले. हिरलगे परिसरातून तो जाधेवाडीच्या हद्दीत गेला. भादवणवाडी परिसरातील पेट्रोल पंपाजवळून रस्ता पार करुन तो खोराटवाडीकडे गेला. गावात अचानक हत्ती आल्याने नागरीकांची तारांबळ उडाली. हा हत्ती मासेवाडी परिसरातील भुतोबा देवालयापासून भादवण फाट्याजवळील डोंगरेवाडीकडून कुंभार वसाहतीकडे गेला.

दरम्यान हा हत्ती हालेवाडी आरदाळ परिसरात येण्याची शक्यता असल्याने तेथील ग्रामपंचायतीने संस्कार वाहिनेवरुन ग्रामस्थाना दक्षतेचा इशारा दिला. शेतक-यानी शेतात जाताना सावधानता बाळगावी असा इशारा देण्यात आला. खोराटवाडीचे वनरक्षक नागेश खोराटे या हत्तीवर लक्ष ठेवून आहेत. खोराटे यांची या परिसरात तिन ठिकाणी शेती आहे. हती त्यांच्या तीन्ही शेतात जावून परत माघारी फिरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : मुंबईला कचरामुक्त शहर करणार, तिसऱ्या मुंबईत इनोव्हेशन सिटी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दावोसमध्ये घोषणा

Pune News : पुणे महापौरपदाची निवडणूक २ फेब्रुवारीला?

तरुणांनो तयारीला लागा..! ‘सीसीटीव्ही’च्या नजरेत ११ फेब्रुवारीपासून पोलिस भरतीची मैदानी चाचणी; एकाच पदासाठी एकाच अर्ज ग्राह्य धरला जाणार

ढिंग टांग : नवीन है वह…!

Global Impact Forum 2026 : ग्लोबल इम्पॅक्ट फोरममध्ये तज्ज्ञांचे मत; टेपा करारामुळे आर्थिक संबंध नव्या उंचीवर

SCROLL FOR NEXT