Tilari dam Hajgoli Chandgad esakal
कोल्हापूर

Tilari Dam : कुटुंबीयांच्या डोळ्यांदेखत मोठी दुर्घटना; तिलारी धरणात बुडाले दोन सख्खे भाऊ

सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कुटुंबीयांच्या डोळ्यांदेखतच ही दुर्घटना घडली.

सकाळ डिजिटल टीम

बेळगावहून एक कुटुंबीय हाजगोळी भागात फिरण्यासाठी आले होते.

चंदगड : हाजगोळी (Hajgoli Chandgad) हद्दीमध्ये तिलारी धरणाच्या (Tilari Dam) बॅकवॉटरमध्ये दोघे सख्खे भाऊ बुडाले. रेहान अल्ताफ खान (वय १५) व त्याचा भाऊ मुस्तफा अल्ताफ खान (१२, रा. कॅम्प, बेळगाव) अशी त्यांची नावे आहेत.

काल सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कुटुंबीयांच्या डोळ्यांदेखतच ही दुर्घटना घडली. पोलिसांनी घटनास्थळी शोध घेतला असता ते अद्याप सापडलेले नाहीत. अंधार आणि पाऊस यामुळे शोधमोहीम थांबवण्यात आली.

आज (ता. ११) सकाळी पुन्हा शोध घेण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक संतोष घोळवे यांनी सांगितले. बेळगावहून एक कुटुंबीय हाजगोळी भागात फिरण्यासाठी आले होते. चाळोबा मंदिरानजीक तिलारी धरणाचे बॅकवॉटर विस्तीर्ण पसरले आहे.

रेहान व मुस्तफा पाण्यात खेळत असताना अंदाज न आल्याने ते बुडू लागले. कुटुंबातील अन्य कोणाला पोहता येत नसल्याने त्यांनी आरडाओरड केली. परंतु परिसरात कोणी नसल्यामुळे मदत उपलब्ध होऊ शकली नाही. यासंदर्भात पोलिस ठाण्याकडे माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक कांबळे, पोलिस नाईक किल्लेदार, काँस्टेबल देसाई बचाव पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या मुलांचा शोध घेतला असता ते सापडले नाहीत. या भागात पाऊस आणि अंधार पडल्यामुळे शोध मोहीम थांबवण्यात आली. उद्या (ता. ११) सकाळी पुन्हा शोध घेतला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT