Two burglars arrested in kolhapur
Two burglars arrested in kolhapur 
कोल्हापूर

गेल्या दीड वर्षापासून ते कोल्हापूर शहर परिसरात करत होते घरफोड्या

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - गेल्या दीड वर्षापासून शहर परिसरात घरफोड्या करणाऱ्या दोघा अट्टल घरफोड्याना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले. त्याच्याकडून 11 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणत 34 तोळे सोन्या चांदीचे दागिने, पिस्तूलसह 13 जिवंत काडतूसासह 27 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असल्याचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांनी सांगितले. 

अटक केलेल्या संशयिताची नावे - प्रशांत काशीनाथ करोशी (वय 35, रा. इस्पूर्ली, ता. करवीर, सध्या रा. पुणे) आणि अविनाश शिवाजी आडवकर (वय 28, रा. धामणे ता. आजरा) अशी आहेत. 

देशावर कोरोनाच संकट उभारले आहे. अशा संकट काळात उपाचराच्या अनुषंगाने अथवा मूळ गावी लाखो नागरिक घराबाहेर पडले. अशा नागरिकांच्या बंद घरावर डल्ला मारण्याचे जिल्ह्यात मोठे प्रकार घडले. घरफोड्यांचा छडा लावण्याचे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने याबाबतचा तपास सुरू केला. पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांना सराईत घरफोड्या संशयित प्रशांत करोशी हा शिये फाटा (ता. हातकणंगले) येथे येणार असून त्याच्याकडे विना नंबर प्लेट असलेली मोटार ही चोरीची असल्याची माहिती मिळाली. तसे सावंत यांनी पथकाला सापळा लावण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने 2 ऑगस्टला शिये फाटा येथे सापळा लावला. याठिकाणी संशयित प्रशांत करोशी हा मोटारीतून जाताना पोलिसांना दिसून आला. त्यांनी त्याला ताब्यात घेऊन मोटारीची झडती घेतली. त्यात चोरीसाठी वापरले जाणारे हॅड्रोलिक जॅक, ऑक्‍सिजन, गॅस सिलिंडर सेट, कटावण्या असे साहित्य मिळून आले. पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी सुरू केली. ही मोटार साथिदार संशयित अविनाश आडवकरच्या मदतीने चोरल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्या दोघांना अटक केली. मिळालेल्या कोठडीत त्यांची कसून चौकशी केली. त्यात शहर परिसरातील 11 घरफोड्या केल्याची कबुली दिली. 

11 गुन्ह्यांचा छडा... 

संशयित करोशी व आडवकर या दोघांकडून जुना राजवाडा, करवीर, राजारामपुरी व शाहूपुरी पोलिस ठाणे असे 11 घरफोडीचे गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले. यात चार मोटारी त्या दोघांनी चोरल्या. त्यापैकी तीन मोटारी या वापरून सोडून दिल्या. मात्र ते दोघे वापरत असलेली एक मोटारीसह पिस्तूल, 13 जिवंत काडतूसे 34 तोळे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, मोटार, एलईडी टीव्ही, मिक्‍सर असा 27 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. 

जप्त पिस्तूल प्रकाश बांदीवडेकरांचे... 

संशयित करोशी हा सध्या पुण्यात राहतो. त्याने भाडेतत्वावर घेतलेल्या फ्लॅटची पोलिसांनी झडती घेतली. त्यात त्यांना एक पिस्तूल, 13 जिवंत काडतूसांबरोबर पिस्तूल मालकाचा परवाना मिळून आला. हा परवाना प्रकाश साताप्पा बांदिवडेकरांचा आहे. त्यांच्या घरातही संशयित घरफोड्यांनी एक वर्षापूर्वी चोरी केली होती. याबाबत करवीर पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. मात्र या गुन्ह्यात फिर्यादी बांदीवडेकर यांनी पिस्तूल चोरीला गेल्याचे तक्रारीत नमुद केले नव्हते. ही बाब पुढे आली आहे. याबाबत सखोल तपास करण्याचे आदेश अधीक्षक डॉ. देशमुख यांनी दिले असल्याचे पोलिस निरीक्षक सावंत यांनी सांगितले. 

तपासाचे शिलेदार...

पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, सहायक पोलिस निरीक्षक सत्यराज घुले, संतोष पवार, कर्मचारी श्रीकांत मोहिते, नेताजी डोंगरे, सचिन गुरखे, राजेश आडूळकर, नितीन चोथे, विजय तळसकर, सागर कांडगावे, ओंकार परब, राजेंद्र हांडे, अजित वाडेकर, रणजित पाटील, संजय पडवळ, संतोष पाटील, रणजित कांबळे, रफिक आवळकर, सुरेश पवार, वैशाली पाटील, सुप्रिया कात्रट व सायबरचे अमर वासुदेव, संदीप गुरव हे तपासाचे शिलेदार ठरले. 
 

संपादन - मतीन शेख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT