two businessmen brothers one and half lakh rupees bag threat from five people in kolhapur 
कोल्हापूर

आधी मारले, मग दीड लाखाला लुटले ; कोल्हापुरात पाच जणांचे कृत्य

सकाळ वृत्तसेवा

गांधीनगर (कोल्हापूर) : दुकान बंद करून दुचाकीवरून घरी निघालेल्या दोन व्यापारी बंधूंना बेदम मारहाण करीत त्यांच्याकडील दीड लाखाची रोकड लुटली. पुणे-बंगळूर महामार्गाजवळ उचगाव रेल्वे पुलावर शुक्रवारी (२) रात्री सव्वाआठच्या सुमारास हा प्रकार घडला. दोन दुचाकीवरून आलेल्या पाच जणांनी ही लूटमार केली. 

मारहाणीत व्यापारी ज्ञानराज नारायण नाडर व त्यांचे बंधू आंबूराज नारायण नाडर (दोघेही रा. निगडे बिल्डिंग, उचगाव, ता. करवीर, मूळ रा. मलिएनकुडी, ता. नागणेरी, जि. त्रियनवेली, तमिळनाडू) जखमी झाले. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. या संदर्भात गांधीनगर पोलिस ठाण्यात आज पहाटे गुन्हा नोंद करण्यात आला. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी : नाडर बंधूंचे तावडे हॉटेल परिसरात मन्ना ट्रेडर्स हे गोळ्या-बिस्किट, फरसाण घाऊक विक्रीचे दुकान आहे. दोघांनी काल रात्री दुकान बंद केले आणि त्यानंतर ते दोन मोटारसायकलींवरून घरी निघाले होते. ज्ञानराज पुढे होते. त्यांच्या गाडीला दीड लाख रुपये असलेली बॅग होती. त्यांच्या मागे दुचाकीवरून आंबूराज होते. ते उचगाव रेल्वे पुलाच्या उतारास आले असताना पाच चोरटे मागून दोन दुचाकींवरून आले. त्यांनी ज्ञानराज यांना अडवून मारहाण सुरू केली. आंबुराज भावाच्या मदतीला धावले. त्यांनाही लुटारूंनी मारहाण केली. त्यात दोघे जखमी झाले. त्यानंतर रोकड असलेली बॅग घेऊन पाचही जण पळून गेले. ते कुठल्या दिशेला गेले, हे मात्र कळू शकले नाही. 

हा प्रकार समजताच पोलिस घटनास्थळी गेले. अपर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, करवीरचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. प्रशांत अमृतकर यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी गांधीनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक भांडवलकर यांना तपासाच्या सूचना दिल्या. गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांनीही घटनास्थळी पाहणी केली. याबाबतची फिर्याद ज्ञानराज नाडर यांनी गांधीनगर पोलिस ठाण्यात दिली आहे.

दोघे संशयित ताब्यात

कोल्हापूर लूटप्रकरणी करवीर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांच्या हाती दोघे संशयित लागले आहेत. त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे. लवकरच छडा लागण्याची शक्‍यता आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Latest Maharashtra News Updates : ..तर हे स्पष्ट होईल, की महाराष्ट्राविषयीचा द्वेष हाच भाजपचा खरा चेहरा आहे! - उद्धव ठाकरे

Pune Crime: आषाढी वारीत मुलीवर अत्याचारप्रकरणी मोठी अपडेट, नराधमांना अटक; आरोपी निघाले...

Murud Crime : पोलिसांच्या मारहाणीत युवकाचा मृत्यू झाल्याचा संशय; नातेवाईकांनी रस्ता अडवला

Government Recruitment 2025: राज्यात मेगाभरती! मुख्यमंत्र्यांची घोषणा; भरती प्रक्रियेचे नियम बदलणार

SCROLL FOR NEXT