kolhapur sakal
कोल्हापूर

Kolhapur: बागेवाडीत दोन कोटी रोकड जप्त!

खासगी बसमध्ये पथकाची कारवाई, एकाला अटक

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : हिरेबागेवाडी चेकपोस्टवर आज तब्बल दोन कोटींची रोकड जप्त करण्यात आली. पुरेशा कागदपत्रांशिवाय रोकड घेऊन जाण्यात येत होती. ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. कारवाईनंतर चेकपोस्टवर अधिक व्यापक तपासणी सुरू असून, भरारी पथके सक्रिय झाली आहेत.

याबाबतची अधिक माहिती अशी ः विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात ६१ चेकपोस्ट कार्यरत आहेत. पैकी हिरेबागेवाडीतील चेकपोस्टवर पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कार्यरत पथकाने ही कारवाई केली आहे. त्यात दोन कोटींची रोकड जप्त केली.

मुंबई येथून मंगळूरकडे खासगी आराम बस मंगळवारी (ता.४) निघाली होती. बस आज (ता.५) पहाटे साडेतीनच्या सुमारास बेळगाव येथील हिरेबागेवाडी चेकपोस्टजवळ पोचली. बसची निवडणूक विभागाच्या विशेष पथकासह पोलिसांनी कसून तपासणी केली. या दरम्यान, एका बॅगेमध्ये सुमारे दोन कोटींची रक्कम मिळाली.

त्यामुळे गुन्हा दाखल करून त्याची माहिती ही प्राप्तीकर विभागाला देण्यात आली. प्राप्तीकर विभागाकडून याची चौकशी व तपास हाती घेण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणी हिरेबागेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून एकाला अटक केली आहे.

कारवाईत पोलिस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा, बेळगाव ग्रामीण एसीपी गोपाळकृष्ण गौडा, बेळगाव ग्रामीण मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी राजशेखर डंबल, पोलिस निरीक्षक अमरेश, एफएसटी पथकाचे शंभूलिंगप्पा, राजेंद्र मोराबाडा यांनी भाग घेतला होता. कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

पथकाचे कौतुक

बागेवाडी चेकपोस्टवर दोन कोटींची रोकड जप्त केल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी नीतेश पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. कारवाईची अधिक माहिती घेऊन त्यांनी पथकाचे कौतुक केले आहे. पोलिस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांनीही येथे भेट दिली आहे. पोलिस आयुक्त एम. बी. बोरलिंगय्या यांनीही पथकाच्या कारवाईचे अभिनंदन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT