संकेश्वर (बेळगाव) : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कणगले (ता. हुक्केरी) येथे कंटेनर आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला. त्यात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. आज (ता. १७) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. पुजेरीलाल यादव (वय ५५) आणि मिश्रीलाल वर्मा (वय २५, दोघेही मूळगाव, मानाप्पा बैरी, जि. बलरामपूर (उत्तर प्रदेश), सध्या रा. अक्कोळ-ता. निपाणी) अशी मयतांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, कंटेनर (एनएल ०१ एई ०२९७) बेळगावहून कोल्हापूरकडे निघाला होता. तर दुचाकी (एमएच ०७ ५९७१) वरून पुजेरीलाल यादव व मिश्रीलाल वर्मा हे संकेश्वरहून निपाणीकडे येत होते. राष्ट्रीय महामार्गावरील कणगला येथे सर्कलनजीक दोन्ही वाहनांचा हा भीषण अपघात झाला. त्यात दुचाकी कंटेनरखाली गेल्याने तिचा चक्काचूर झाला तर दोघांचा जागीच मृत्यू झाला.
दोघेही १२ वर्षांपासून वास्तव्यास होते. इमारतीला रंग देण्याचा त्यांचा व्यवसाय आहे.हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथे एका नव्या इमारतीचे रंगकाम चालू होते. तेथील काम संपवून दोघेही अक्कोळकडे येत असताना हा अपघात झाला.
संकेश्वर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक गणपती कोगेनहळी आणि सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी व पंचनामा केला. घटनेची फिर्याद सतीशकुमार पुजरीलाल यादव यांनी दिली आहे. पुजारीलाल यादव यांच्या मागे पत्नी व तीन मुले आहेत. पत्नी दोन मुले उत्तर प्रदेशात वास्तव्यास आहेत. मिश्रीलाल वर्मा यांच्या मागे आई, वडील, पत्नी व मुलगा आहे. कंटेनर संकेश्वर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. संकेश्वर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.
गावी जाण्याआधीच काळाचा घाला
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मार्चपासून दोघेही उत्तर प्रदेशला गावी गेले नव्हते. घेतलेले रंगकाम संपवून गावी जाण्याच्या तयारीत ते होते. मात्र त्याआधीच अपघाताच्या रूपाने काळाने त्यांच्यावर घाला घातला. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
संपादन - धनाजी सुर्वे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.