Cat Case Kabanur Ichalkaranji  esakal
कोल्हापूर

Ichalkaranji : मांजर गायब झाल्याच्या कारणावरून कोयता, लोखंडी सळीनं तुंबळ हाणामारी; हल्ल्यात बापासह दोन मुलं जखमी

बबलू खान यांच्यासह सहा ते सात जणांनी इस्माईल मकानदार यांच्यावर कोयत्याने वार केले.

सकाळ डिजिटल टीम

कबनूर येथील दावतनगर परिसरात इस्माईल मकानदार हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. त्याच परिसरातील बबलू खान यांनी घरी मांजर पाळले आहे.

इचलकरंजी : कबनूर (ता. हातकणंगले) येथे मांजर (Cat) गायब झाल्याच्या कारणावरून कोयता, लोखंडी सळीने तुंबळ हाणामारी झाली. या हल्ल्यात बापासह दोन मुले जखमी झाली आहेत.

इस्माईल रेहमान मकानदार (वय ४२), तौफिक इस्माईल मकानदार (वय १९), आसिफ इस्माईल मकानदार (वय २१) अशी त्यांची नावे आहेत. या हल्ल्यानंतर जखमींच्या समर्थकांनी हल्लेखोरांच्या घरावरच हल्ला करत नुकसान केले.

याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस (Shivajinagar Police) ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, कबनूर येथील दावतनगर परिसरात इस्माईल मकानदार हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. त्याच परिसरातील बबलू खान यांनी घरी मांजर पाळले आहे. ते मांजर घरात न आढळल्याने खान यांचा मकानदार यांच्याशी वाद झाला होता.

हा वाद काल सकाळी पुन्हा उफाळून येत वादावादी झाली. यातून बबलू खान यांच्यासह सहा ते सात जणांनी इस्माईल मकानदार यांच्यावर कोयत्याने वार केले. तसेच लोखंडी सळीनेही मारहाण केली. तौफिक आणि आसिफ या मुलांनाही मारहाण करुन जखमी केले. जखमींवर आयजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेनंतर जखमींच्या समर्थकांनी हल्लेखोरांच्या घरावर हल्ला करत प्रापंचिक साहित्याचे नुकसान केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gauri Garje Case: ''पंकजाताईंकडे पाहून मुलगी दिली होती...'' गौरी गर्जेच्या वडिलांची पत्रकार परिषद, अनंत गर्जेवर गंभीर आरोप

Thane Water Supply: ठाण्यात २४ तास पाणीकपात! जाणून घ्या कधी अन् कोणत्या भागात परिणाम होणार?

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये अफ्रिकन स्वाईन फिव्हरमुळे 9 वरहांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर

पलाश मुच्छल स्मृतीला धोका देत होता? फ्लर्टी चॅट्स व्हायरल, लग्न मोडणार?

Mamata Banerjee warned BJP : ‘’जर भाजपने बंगालमध्ये माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तर...’’ ; ममता बॅनर्जींनी दिला जाहीरपणे इशारा!

SCROLL FOR NEXT