two more corona patients in kolhapur
two more corona patients in kolhapur 
कोल्हापूर

ग्रामस्थांची विनंती धुडकावून देत ती मुंबईहून आली गावी अन्.... हारूर व संरबळवाडी गावे झाली क्वारंटाईन....

सकाळ वृत्तसेवा

आजरा (कोल्हापूर) : हारूर (ता. आजरा) येथे मुंबईहून आलेल्या माय लेकरांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आजऱ्यासह गडहिंग्लज तालुक्‍यात खळबळ उडाली आहे. त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयाकडे पाठवण्यात आले आहे.

प्रशासनाने हारूर पासूनचा सभोतालचा तीन किलोमीटरचा परिसर सील केला आहे. गावात शंभर कर्मचारी कार्यरत असून ग्रामस्थांची तपासणी व निर्जतुंकीकरण केले जात आहे. प्रशासनाने तळ ठोकला असून शंभर कर्मचारी कार्यरत असल्याने गावाला छावणीचे स्वरुप आले आहे. हारूर व महागाव परिसर हॉट स्पॉट बनला आहे. हारुर सरंबळवाडी ही दोन गावे क्वारंटाईन केली जाणार असल्याचे प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी व तहसीलदार विकास अहिर यांनी सांगीतले. 

महागावपर्यंतचा परिसर हॉटस्पॉट
मुंबई पोलीस दलात असलेल्या महीलेच्या मुलाचे काही दिवसांपुर्वी मुंबईत निधन झाले. त्याचा मृतदेह घेवून सदर महीला व तिचा लहान मुलगा बुधवार (ता.6) गावी आले. हिरण्यकेशी नदीकाठावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुंबई व पुणे हे सध्या कोरोनामुळे हॉटस्पॉट बनलेली ठिकाणे असल्यामुळे त्या महीलेला कोरोना दक्षता समितीने मृतदेह गावी घेवून येवू नका मुंबईतच अंत्यसंस्कार करा. लॉक डाऊन उठल्यानंतर व परिस्थिती निवळल्यावर गावी येवून उर्वरीत संस्कार करावेत अशी विनंती केली होती.

प्रशासनाचा तळ

पण ग्रामस्थांची विनंती तिने धुडकावून लावल्याचे ग्रामस्थांनी सांगीतले. त्यामुळे या अंत्यसंस्काराला ग्रामस्थ उपस्थित नव्हते. संबंधीत महीलेचे त्यानंतर स्वॅब घेण्यात आले होते. त्या दोघांना आजऱ्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृहात संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले. काल शुक्रवार (ता. 8) ला त्या दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर प्रशासन पातळीवर वेगाने हालचाली झाल्या. तहसीलदार विकास अहिर, सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे यांनी संबंधीत महीलेची बॅक हिस्ट्री (पुर्व इतिहास) याची माहीती घेतली. त्यांना पहाटे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले.

तीन किलोमीटरचा परिसर सील

दरम्यान आज सकाळी प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्यास सुरवात केली. त्यांच्या संपर्कात आलेल्यांना संस्थात्मक विलगीकरण करण्यास सुरवात केली आहे. त्याचे स्वॅब घेवून तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविले जाणार आहेत. हारुरमध्ये लॉक डाऊन करण्यात आले असून गावातील कोणीही घरातून बाहेर पडू नयेत अशी सुचना केली आहे. शेतीसह दैनंदिन व्यवहार बंद ठेवण्यात आले आहे. गावच्या वेशीवर पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. आरोग्य विभागाकडून गावात निर्जतुंकीकरण करण्यात असून ग्रामस्थांची तपासणी सुरु केली आहे. प्रातांधिकारी डॉ. संपत खिलारी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार विकास अहिर, गटविकास अधिकारी बी. डी. वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे कार्यरत आहेत. 

मलीग्रे व महागाव मध्ये चेक पोस्ट नाका
मलिग्रे व महागाव येथे पोलीसांनी चेक पोस्ट नाका केला जात आहे. या ठिकाणी रस्तामध्ये चर मारला असून एकेरी वहातुक सुरु ठेवली जाणार आहे. येणाऱ्या जाणाऱ्यांची चौकशी केली जाणार आहे.


भटजीसह 19 जणांचे स्वॅब तपासणीसाठी
अंत्यसंस्काराला उपस्थित असलेल्या भटजीसह सहाजणांना प्रशासनाने संस्थात्मक क्वारंटाईन केले आहे. ते व त्यांच्या संपर्कात आलेल्या 19 जणांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोग शाळेकडे पाठवले जाणार आहेत. त्यांच्या संपर्कात आलेले ग्रामस्थ, नातेवाईक यांची प्रशासनाने चौकशी सुरु केली असून अनेक जण क्वारंटाईन केले जाणार आहेत.


 संरबंळवाडी परिसरातील गावांना धास्ती
सरंबळवाडी, कोनोली, दाभेवाडी, गजरगाव, निंगुडगे, महागाव, उंबरवाडी, मलिग्रे या गावात लॉकडाऊन वाढला आहे. कोरोनापासून मुक्त असलेल्या या परिसरात कोरोनाने शिरकाव केल्याने धास्ती वाढली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

DC vs MI, IPL: लाईव्ह सामन्यात पंतला आवरेना रोहितने हाती दिलेला पतंग उडवण्याचा मोह, Video Viral

Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

Praniti Shinde : ''मविआची सत्ता असतानाही मंत्रिपदासाठी मी लॉबिंग केलं नाही , कारण...'' प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

IPL 2024 LSG vs RR Live Score : शतकी भागीदारी रचणारी राहुल - हुड्डाची जोडी फुटली; लखनौ 150 च्या जवळपास पोहचली

SCROLL FOR NEXT