two wheeler bike disturb to parents and students in road kolhapur 
कोल्हापूर

बघता बघता त्यांच्यात हाणामारी सुरू झाली आणि पालकांना फुटला घाम

राजेश मोरे

कोल्हापूर : पाच ते सहा तरूण शिव्या देत एकमेकांवर धावून गेले. त्यांच्यात भररस्त्यात हाणामारी सुरू झाली. तशी रस्त्यावरून जाणाऱ्या विद्यार्थी पालकांची तारांबळ उडाली. ते ओरडा करत धावाधाव करू लागले. न्यू महाद्वाररोड परिसरात सोमवारी भरदुपारी हा प्रकार घडला. 

कोरोना संकटानंतर शाळा महाविद्यालये पुन्हा सुरू झाली आहेत. जशी विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली. तसे टवाळखोरही डोकेवर काढू लागलेत. सोमवारी दुपारी शाळा सुटली. शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने न्यू महाद्वारोड परिसरातून घरी जात होते. तसेच अनेक पालक मुलांना चालत व गाडीवरून मुलांना घरी घेऊन जात होते. अचानक मोटारसायकलवरून काही तरूण याभागात शिव्यांची लाखोली वाहत तेथे आले. ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले.

बघता बघता त्यांच्यात हाणामारी सुरू झाली. या हाणामारीत अनेक पालक वाहन व पाल्यांसह त्यात अडकले. त्यांच्यासह विद्यार्थ्यांनीही ओरडा सुरू केला. तसे ते तरूण आपापल्या मोटारसायकलवरून पसार झाले. हा काही मिनीटांचा प्रकार अनेक पालकांसाठी धक्कादायक होता. पण काहीजण हा प्रकार आम्हाला नेहमीचाच आहे. म्हणूनच आम्ही मुलांना नेहमी शाळेत सोडण्यासाठी व घरी घेऊन जाण्यासाठी येतो असे सांगत होते. 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Railway: मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली! कसाऱ्याकडे जाणाऱ्या लोकल ठप्प, ४५ मिनिटं प्रवाशांचा खोळंबा

Baramati Lok Adalat : बारामती लोकअदालतीत ५६२७ प्रकरणे निकाली; साडेसहा कोटींची वसुली

Baramati Crime News: बारामतीतील पणदरे गावात विवाहित महिलेचा गळा आवळून खून; अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

Balochistan Blast : बलुचिस्तानात पाकिस्तानी सुरक्षा दलाच्या ताफ्यावर मोठा हल्ला; २३ जवानांचा मृत्यू , BLAचा हात असल्याचा संशय

Marathi News Live Updates : अरविंद केजरीवाल यांची 'गोवा फॉरवर्ड पार्टी' आणि 'आम आदमी पार्टी' च्या युतीची घोषणा

SCROLL FOR NEXT