Electric Shock Kolhapur Crime News esakal
कोल्हापूर

Kolhapur Crime : कडबाकुट्टी यंत्रानं घेतला सासू-सुनेचा बळी; विजेच्या धक्क्यानं दोघींचा दुर्दैवी अंत, गावावर शोककळा

दुर्घटना लक्षात येताच सुधाकर यांनी मशीनचा वीजपुरवठा बंद केला.

सकाळ डिजिटल टीम

खूप उशीर झाल्याने दोघी घरी आल्या नाहीत म्हणून आनंदीबाई यांची धाकटी सून नीता गोठ्यावर गेल्या. त्यांनी घटनास्थळाचे चित्र पाहून आरडाओरडा केला.

नंदगाव : म्हाळुंगे (ता. करवीर) येथे काल सायंकाळी गोठ्यात जनावरांसाठी कडबाकुट्टी काढत असताना सासू-सुनेचा विजेचा धक्का (Electric Shock) बसून जागीच मृत्यू झाला. श्रीमती आनंदी नामदेव मोरबाळे (वय ७०) व सुनीता शामराव मोरबाळे (४०) अशी त्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांकडून दिलेली माहिती अशी : आनंदी यांच्यासह सून सुनीता, धाकटा मुलगा नागोजी जनावरांच्या धारा काढण्यासाठी गावापासून काही अंतरावर असलेल्या कुर्डू रस्त्यावरील गोठ्यावर गेले होते. धारा काढून झाल्यानंतर नागोजी दूध घालण्यासाठी गावातील डेअरीकडे गेले.

त्यानंतर आनंदीबाई व सुनीता यांनी कडबाकुट्टी करण्यासाठी मशीन सुरू केले असावे. त्यात त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला. खूप उशीर झाल्याने दोघी घरी आल्या नाहीत म्हणून आनंदीबाई यांची धाकटी सून नीता गोठ्यावर गेल्या. त्यांनी घटनास्थळाचे चित्र पाहून आरडाओरडा केला. तो ऐकून गोठ्याशेजारील सुधाकर पाटील यांनी तेथे धाव घेतली.

दुर्घटना लक्षात येताच सुधाकर यांनी मशीनचा वीजपुरवठा बंद केला व आनंदीबाई यांच्या दोन्ही मुलांना दूरध्वनी करून घटनास्थळी बोलावले. आनंदीबाई यांचा मोठा मुलगा शामराव कामानिमित्त बाहेरगावी गेला होता. दोघांनीही घटनास्थळी येऊन याबाबतची फिर्याद इस्पुर्ली पोलिस ठाण्यात दिली.

त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला. सुनीता यांना पंधरा वर्षांची मुलगी आहे. पती शामराव यांचा टेम्पो वाहतुकीचा व्यवसाय आहे. मोरबाळे कुटुंबीयांची जमीन कमी आहे. त्यामुळे दूध व्यवसाय, शेतात मोलमजुरी करून ते आपला उदरनिर्वाह करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

एकतर्फी निकाल की धक्कादायक उलथापालथ? काँग्रेसच्या तटस्थ भूमिकेचा फायदा कुणाला? अमरावती विधानपरिषदेचा आज फैसला

Industrial Pollution : कुरकुंभ एमआयडीसीतील ‘हार्मनी ऑर्गेनिक्स’वर प्रदूषण प्रकरणी कडक कारवाई; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून उत्पादन तत्काळ बंद करण्याचे आदेश

उत्तम गुंतवणूक : निफ्टी इंडिया डिफेन्स निर्देशांक : गुंतवणुकीची आकर्षक संधी

Pune Traffic: बाबा भिडे पूल २२ जून ते ६ जुलैपर्यंत पूर्ण बंद; डेक्कन मेट्रो पादचारी केबल पुलाच्या कामासाठी वाहतूक बदल, पर्यायी मार्ग जाहीर

Pesarattu Recipe: प्रोटीनने भरपूर, चवीला जबरदस्त! आंध्र प्रदेशचा लोकप्रिय नाश्ता पेसरट्टू; एकदा खाल तर पुन्हा पुन्हा ट्राय कराल

SCROLL FOR NEXT