Vasantdada sugar factory manufactures the first hand sanitizer sanitizer in Maharashtra  
कोल्हापूर

वसंतदादा साखर कारखान्याने बनवले महाराष्ट्रातील पहिले हॅन्ड सॅनिटायझर सॅनिटायझर...

सकाळ वृत्तसेवा

सांगली- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सॅनिटायझर्स निर्मितीची परवानगी मिळाल्यानंतर वसंतदादा सहकारी साखर कारखान्याने हॅन्ड सॅनिटायझरची पहिली बॅच तयार केली. 99% प्युअरिटीचे अल्कोहोल असलेले जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशा नुसार तयार झालेले महाराष्ट्रातील पहिले हॅन्ड सॅनिटायझर आहे. 'आय एम टीम विशाल' नावाने ते बाजारात आणले आहे.

कोरोनाचा प्रसार वाढला असून खबरदारीचा उपाय म्हणून सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन केले जात आहे. त्यामुळे सॅनिटायझरचा तुटवडा जाणवत आहे. साखर कारखान्यात निर्माण होत असलेल्या अल्कोहोलपासून सॅनिटायझर निर्मिती करण्याबाबत प्रशासनाने सूचना दिल्या आहेत. त्यानुसार वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी तातडीने सॅनिटायझर निर्माण करण्याबाबत निर्णय घेतला.वसंतदादा कारखान्याच्या डिस्टिलरीमध्ये गुरुवारपासून सॅनिटायझर निर्मितीस प्रारंभ झाला. अर्धा लीटर ते पाच लीटर बाटलीमध्ये सॅनिटायझर बनवले जात आहे. आज पहिली बॅच बाहेर पडली.

'आय एम टीम विशाल' या नावाने ब्रॅन्ड बनला असुन 'जाॅईन टीम विशाल' असे आवाहन बाटलीवरील स्टीकरवरुन केले आहे. विशालदादा युवा प्रतिष्ठानतर्फे या सॅनिटायझरचे मोफत वितरण केले जाणार आहे.
सार्वजनिक ठिकाणे, शासकीय कार्यालये तसेच नागरिकांना मोफत वितरण करण्यासाठी प्रतिष्ठानने यंत्रणा उभारली आहे. वसंतदादा कारखान्यामार्फत उत्पादन घेतले जाणार आहे. दररोज पाचशे बाटल्या उत्पादीत केल्यानंतर त्याचे जिल्हाभर वितरण केले जाणार आहे.

"कोरोनाचा प्रसार रोखला जावा यासाठी नफ्याचा विचार न करता सॅनिटायझर बनवले जात आहे. त्याचे नागरिकांना मोफत वितरण केले जाणार आहे."
- विशाल पाटील (अध्यक्ष, वसंतदादा कारखाना)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 18 लाँच होताच जुन्या iPhoneच्या किमती वाढल्या! iPhone 17, iphone 17 pro सह कोणते मॉडेल महागले?

क्रिकेटच्या कारभारात मोठा बदल होणार? सर्वोच्च न्यायालयाने BCCIसमोर उपस्थित केला ‘हा’ सवाल; १२ वर्षांपासून प्रलंबित प्रकरण पुन्हा चर्चेत

IPS Mohita Sharma: कोण आहेत आयपीएस मोहिता शर्मा? KBCमध्ये १ कोटी रुपयांचा जॅकपॉट जिंकून, पाचव्या प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण

Asian Games 2026 पूर्वी टीम इंडियाला धक्का! स्टार खेळाडू संघातून बाहेर, बदली खेळाडूची झाली घोषणा

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात पुण्याच्या मध्यवर्ती भागातील बारा प्रमुख रस्त्यांवर जड वाहनांना बंदी

SCROLL FOR NEXT