Vegetable imports and exports stopped kolhapur marathi news
Vegetable imports and exports stopped kolhapur marathi news 
कोल्हापूर

आता काय करु म्हणत ३ टन ढबू दिले शेतात फेकून....

गणेश शिंदे

जयसिंगपूर (कोल्हापूर) : कोरोना संक्रमणामुळे सध्या सर्वानाच फटका बसत आहे. यातून शेतकरी तरी कसा सुटेल? याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. भाजीपाल्याला मागणी नाही, दर नाही यामुळे हेरवाड (ता. शिरोळ) येथील शेतकरी सुकुमार पाटील यांच्यावर तीन टन ढबू मिरची चक्क शेतात विस्कटून टाकण्याची वेळ आली. यात त्यांचे सुमारे अडीच लाखाचे नुकसान झाले. 

१४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामुळे पिकवलेला ढबू शेतातच सडत आहे. हेरवाडच्या सुकूमार पाटील यांच्या एक एकरातील ३ टन ढबू फेकून देण्यात आले असून यामध्ये त्यांचे सुमारे अडीच लाखाचे नुकसान झाले. कोरोनामुळे सर्वच व्यवसायाना फटका बसत आहे. यामध्ये शेतकरीही सापडला असून कोरोनाच्या संकटात आता शेतकरीही भरडला जात आहे. 

यातून शेतकरी तरी कसा सुटेल?

पाटील यांनी प्रवीराम कृषी ॲग्रो कामेरी यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या एक एकर शेतामध्ये ढबूची लागण केली होती. यासाठी त्यांनी नांगरणी, औषध फवारणी यासह विविध कामांसाठी मोठा खर्च केला आहे. मात्र, दर्जेदार ढबू लागल्यानंतर कोरोनाच्या संक्रमणाने अख्या जगात हाहाकार माजविला आहे.

लॉकडाऊनमुळे भाजीपाल्याची आयात-निर्यात थांबली    

  पाटील यांनी आपल्या शेतातील ढबू गावातील ग्रामस्थांना मोफत दिली. गेल्या अनेक दिवसापासून ढबूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत होते. मात्र, बाजारपेठ नसल्याने दर्जेदार तयार झालेला ढबू आपल्याच शेतात विस्कटण्याची वेळ त्यांच्यावर आली. त्यांनी ट्रॅक्टर ट्रॉलीच्या माध्यमातून सुमारे तीन टन ढबू आपल्या शेतात विस्कटले. याबाबत बोलताना सुकूमार पाटील म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठे नुकसान झाले आहे. तरीही कोरोनाच्या लढ्यासाठी मागे हटणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : स्वाती मालीवाल प्रकरणी विभव कुमार यांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

Aye Haye Oye Hoye Viral Song: जे गाणं ऐकल्यानंतर नेटकऱ्यांनी कानावर ठेवले हात, त्याचं ओरिजनल व्हर्जन आहे भन्नाट

Indian Team Coach : द्रविड, लक्ष्मणनंतर ऑस्ट्रेलियाच्या या दिग्गजाचाही नकार; हेड कोच निवडताना बीसीसीआयची वाढणार डोकेदुखी?

Narayana Murthy: आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे नोकऱ्यांवर काय परिणाम होणार? नारायण मूर्तींनी दिले उत्तर

SCROLL FOR NEXT