Vegetable Vendors At A New Location In Gadhinglaj Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

गडहिंग्लजला भाजी विक्रेते नव्या जागेत 

अजित माद्याळे

गडहिंग्लज : शहरातील लक्ष्मी रोडसह इतर भागांत बसून भाजी विक्री करणारे विक्रेते आज पालिकेने ठरवून दिलेल्या मुलींच्या हायस्कूलजवळील जागेत स्थलांतरित झाले. यामुळे लक्ष्मी रोड परिसर रिकामा झाला होता. परिणामी वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली. सर्व विक्रेत्यांनी नव्या जागेत व्यवसाय सुरू केल्याने ग्राहकांचाही प्रतिसाद मिळत आहे. 

शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या आणि गर्दीचे केंद्र बनलेल्या लक्ष्मी रोड परिसर हातगाड्यावरून फळ विक्री करणाऱ्यांसह भाजी विक्रेत्यांनी व्यापला होता. यामुळे या रस्त्यावरून चालत जाणेही मुश्‍कील ठरत होते. वाढत्या गर्दीमुळे कोरोना संसर्गाचा धोकाही होता. यामुळे पालिका प्रशासनाने आजपासून तात्पुरत्या स्वरूपात फळ आणि भाजी विक्रेत्यांना मुलींच्या हायस्कूलजवळील खुल्या जागेत स्थलांतरित होण्याची सूचना केली होती.

त्यानुसार आजपासून त्याची कडक अंमलबजावणी सुरू झाली. मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांच्या आदेशाने अतिक्रमण विभागाच्या पथकाने ही अंमलबजावणी आज केली. सर्व भाजी विक्रेते यांनी नव्या जागेत बसून व्यवसाय केला. ग्राहकांनीही चांगला प्रतिसाद दिला आहे. या निर्णयाने लक्ष्मी रोड परिसर रिकामा झाला आहे. सायंकाळच्या सुमारास या परिसरात शांतता होती. वाहतूकही सुरळीत सुरू होती. 

फळ विक्रेते कुठे? 
दरम्यान, फळ विक्रेते मात्र नव्या जागेत दिसत नव्हते. याबाबत पालिकेकडे विचारणा केली असता, या विक्रेत्यांनी आज व्यवसायच बंद केल्याचे सांगण्यात आले. नव्या जागेतही एकही फळविक्रेता आणि लक्ष्मीरोड परिसरातही हातगाडा दिसला नाही. यामुळे फळ विक्रेते एक, तर शहरातील विविध भागांत विखुरले असावेत किंवा व्यवसाय बंद केला असावा, अशी शंका व्यक्त केली; परंतु उद्यापासून हे विक्रेतेही स्थलांतरित होतील, असा विश्‍वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP vs Shivsena: शिंदेंना घरातच घेरण्याची भाजपची रणनीती, अंतर्गत बदल्याच्या राजकारणाने मोठी खळबळ! शिंदेसेनेचा कट्टर विरोधक निवडणूक प्रभारी

Maharashtra Government : राज्यात स्थापन होणार ‘शहरी आरोग्य आयुक्तालय’, शहरांतील आरोग्य सेवेला मिळणार नवे बळ

Latest Marathi Live Update News: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी आमरण उपोषण सुरू

प्रेमाच्या हळव्या भावनांना स्पर्श करणारं 'सावरताना...' गाणं प्रदर्शित; मुक्ता-सचितच्या केमिस्ट्रीवर प्रेक्षक फिदा

भाईजानचा नवा अवतार! सलमान साकारणार छत्रपतींचा विश्वासू जीवा महाला

SCROLL FOR NEXT