viral photo on social media the old photo of kolhapuri political leaders 
कोल्हापूर

फोटोमध्ये दडलंय काय ? राजकारणातले एकमेकांचे विरोधक कधीकाळी होते जीवलग

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : एकेकाळचे जीवलग मित्र; पण आता वेगवेगळ्या राजकीय दिशेला असलेल्या दिग्गजांचा श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्यासोबत असलेला एकत्रित फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

अर्थात याला निमित्त आहे ते खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या काल झालेल्या वाढदिवसाचे आणि त्यात हा फोटो जुना असला तरी तो त्यांच्याच वाढदिवसाचा आहे. त्या वेळी वाढदिवसाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या या दिग्गज राजकीय नेत्यांच्या आजच्या राजकीय वाटा मात्र वेगवेगळ्या झाल्या आहेत. हा फोटो किती वर्षांपूर्वीचा आहे याची माहिती नाही; पण त्यात खासदार संभाजीराजे वाढदिवसाचा केक कापत असताना त्यांच्या उजव्या बाजूला माजी खासदार धनंजय महाडिक तर डाव्या बाजूला माजी आमदार चंद्रदीप नरके, गृहराज्यमंत्री सतेज पाटील व संभाजीराजे यांचे धाकटे बंधू माजी आमदार मालोजीराजे असे क्रमाने उभे आहेत. या सर्वांचा हा ऐन उमेदीतील फोटो आहे, त्यातही या सर्वांचा त्यावेळचा पोशाख बघितला तर ‘कॉलेज लाईफ’चा फिल त्यात आहे. हे सर्वजण एकेकाळचे जीवलग मित्र. त्यानंतर कोण लोकसभेत तर कोण विधानसभा, राज्यसभेत पोहचला पण त्या काळात एकत्र असलेल्यांच्या राजकीय वाटा मात्र वेगळ्या झाल्या.

महाडिक राष्ट्रवादीतून खासदार झाले आणि आता भाजपात आहेत. नरके मूळचे काँग्रेसच्या विचारसरणीचे; पण पर्याय नसल्याने शिवसेनेत गेले आणि सलग दोनवेळा आमदार झाले. मालोजीराजे मूळचे राष्ट्रवादीत पण निवडणुकीच्या आदल्या दिवशी त्यांचा काँग्रेस प्रवेश झाला आणि शहरातून ते काँग्रेसच्या तिकिटावर आमदार झाले.

सतेज पाटील यांनी विधानसभेची पहिली निवडणूक अपक्ष लढवून जिंकली; पण पाठिंबा काँग्रेसला दिला, तेव्हापासून ते काँग्रेसमध्येच आहेत. काळाच्या ओघात महाडीक-सतेज पाटील यांच्यात राजकीय वाद सुरू झाला. मालोजीराजे राजकारणापासून अलिप्त राहीले. संभाजीराजे यांना राष्ट्रपतीच्या कोट्यातून खासदारकी मिळाली तर नरके विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झाले.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

6G India : भारतात लवकरच सुरू होणार 6G इंटरनेट; IIT हैदराबादच्या विद्यार्थ्यांनी बनवला प्रोटोटाइप, हे नेमकं आहे तरी काय? जाणून घ्या

Kirit Somaiya : किरीट सोमय्यांचा आरोप खरा ठरला? मालेगाव बनावट कागदपत्र प्रकरणाचा तपास वेगवान

Solapur fraud:'बार्शीतील अनेकांची एक कोटी ७० लाखांची फसवणूक'; शेअर बाजारात गुंतवणुकीचे दाखवले आमिष, सात जणांवर गुन्हा

INDW vs AUSW : भारतीय संघाला धक्का! मधल्या फळीतील प्रमुख खेळाडूची मालिकेतून माघार; पुण्याच्या खेळाडूला मिळाली संधी

Mumbai News: जिथे कबुतरखाने तिथे चिकन-मटण सेंटर! ‘आम्ही गिरगावकर’ संस्था आक्रमक

SCROLL FOR NEXT