Vishalgad Encroachment Case Vishva Hindu Parishad Sambhaji Raje esakal
कोल्हापूर

14 जुलैला हिंदू समाजाला विशाळगडावर बोलावून संभाजीराजे दुफळी माजवत आहेत का? विश्‍व हिंदू परिषदेचा सवाल

'सर्वच गडकिल्यांवरील अतिक्रमणे हटवावीत. अन्यथा, वक्फ बोर्डाच्या जागांवर आम्हीही मंदिर बांधू.’

सकाळ डिजिटल टीम

हिंदू समाजाने कोणताही आततायीपणाची कृती न करता शांतपणे लढ्यात सहभागी व्हावे.

कोल्हापूर : संभाजीराजे (Sambhaji Raje) सहा वर्षे खासदार होते. त्या कालावधीत त्यांनी विशाळगडावरील (Vishalgad) अतिक्रमणाविषयी आवाज उठविला नाही. सात जुलैला महाआरती दिवशी त्यांनी बैठका का बोलाविली?, आता स्वतंत्र १४ जुलैला आंदोलन का करीत आहेत? हा प्रश्‍न उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या विषयावरून सकल हिंदू समाजाची (Hindu Community) त्यांनी दिशाभूल आणि राजकारण करू नये, असे आवाहन विश्‍व हिंदू परिषदेचे (Vishva Hindu Parishad) जिल्हाध्यक्ष कुंदन पाटील यांनी केले.

याविषयी मिरजकर तिकटीजवळील विठ्ठल मंदिरात आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पाटील म्हणाले, ‘संभाजीराजेंनी रायगड प्राधिकरणाच्‍या अध्यक्षपदाच्या कालावधीत हा प्रश्‍न हाती का घेतला नाही? सर्वच गडकिल्ल्यांवरील अतिक्रमणाविरोधात नेतृत्‍व करावे. त्यांच्यासोबत काम करू. आता सकल हिंदू समाजाची महाआरती झालेली असताना परत एकदा १४ जुलैला हिंदू समाजाला विशाळगडावर बोलावून संभाजीराजे समाजात दुफळी माजवत आहेत का?

त्यांना याविषयी आस्था असेल तर त्यांनी उच्च न्यायालयात चांगला अधिवक्ता द्यावा. त्यांच्या आवाहनानंतर गडावर कोणता अनुचित प्रकार घडला तर त्याला उत्तरदायी कोण?, त्यामुळे हिंदू समाजाने कोणताही आततायीपणाची कृती न करता शांतपणे लढ्यात सहभागी व्हावे. अतिक्रमणाला उत्तरदायी असलेल्या सर्वच तत्कालीन अधिकाऱ्यांवर कारवाई अपेक्षित आहे. या प्रश्‍नाला कोणीही धार्मिक रंग देऊ नये. यात दोन्ही समाजांतील लोकांनी अतिक्रमण केले आहे. सर्वच गडकिल्यांवरील अतिक्रमणे हटवावीत. अन्यथा, वक्फ बोर्डाच्या जागांवर आम्हीही मंदिर बांधू.’

यावेळी हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष दीपक देसाई, शहराध्यक्ष गजानन तोडकर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख उदय भोसले, अखिल भारत हिंदू महासभा जिल्हाध्यक्ष संदीप सासने, महाराज प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष निरंजन शिंदे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनिरुद्ध कोल्हापुरे, शिवशाही फाउंडेशनचे सुनील सामंत, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे शहर कार्यवाह आशिष लोखंडे, हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष मनोहर सोरप, प्रमोद सावंत, अभिजित पाटील, राजू तोरस्कर, ॲड. केदार मुनीश्‍वर, ऐश्‍वर्या मुनीश्‍वर, योगेश केरकर, सोहम कुराडे, आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lawyer Rakesh Kishor: मोठी बातमी! सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलावर कारवाई; बार कौन्सिलने घेतला मोठा निर्णय

Kannad Nagarparishad Election : कन्नड नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव; शहरात ‘भावी वहिनीसाहेब’ ताईसाहेब चर्चेत

Latest Marathi News Live Update : “विंचूर हादरलं पेठेत प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ कडकडीत बंद”

Dombivali News : दिवा स्वतंत्र पोलीस ठाण्याचा विषय मार्गी लावा; मनसे नेते राजू पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

By-elections in Seven States : बिहार निवडणुकीसोबतच सात राज्यातील आठ विधानसभा जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा!

SCROLL FOR NEXT