Vishalgad Riots MP Dhairyasheel Mane esakal
कोल्हापूर

इम्तियाज जलीलांचे 'ते' वक्तव्य गादीचा अवमान नाही का? विशाळगड दंगलीवरुन खासदार मानेंचा काँग्रेसला सवाल

गजापुरातील (Vishalgad Riots) घटनेवर बोलणारे दसरा चौकातील शाळेच्या बसवर झालेल्या दगडफेकीबद्दल ब्र शब्दही काढत नाहीत.

सकाळ डिजिटल टीम

''गजापुरात जी चुकीची घटना घडली ती शिवभक्तांकडून होणार नाही. यामध्ये एक प्रकारचा पॅटर्न दिसतो. त्यामुळे तोडफोड करणारे नेमके कोण होते, ते कोठून आले या सर्वांची सखोल चौकशी करावी.''

कोल्हापूर : माजी खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी विशाळगडाच्या घटनेवरून प्रतिक्रिया दिली. ते म्हणतात, ‘लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने आमच्याकडे मतांची भीक मागितली. जलील यांच्या या विधानामुळे कोल्हापूरच्या गादीचा अवमान होत नाही का?, तसेच याबाबत आता काँग्रेस जलील यांना जाब विचारणार का? असा सवाल धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांनी पत्रकार परिषदेत केला.

तसेच गजापुरातील (Vishalgad Riots) घटनेवर बोलणारे दसरा चौकातील शाळेच्या बसवर झालेल्या दगडफेकीबद्दल ब्र शब्दही काढत नाहीत. आगामी निवडणुकीत मतांचे राजकारण करण्यासाठी काँग्रेस गप्प बसली आहे, असेही खासदार माने म्हणाले.

खासदार माने म्हणाले, ‘विशाळगडाच्या घटनेनंतर काँग्रेसची भूमिका अनाकलनीय आहे. निवडणुकीच्या काळात काही आरोप केला की गादीचा अवमान म्हणून काँग्रेसवाले ओरडत होते. आता जलील यांना जाब विचारणार नाही का? शिवभक्तांना अतिरेकी म्हणून संबोधले जाते याचेही चिंतन काँग्रेसने करावे. मतांसाठी काँग्रेस आणि आघाडीचे नेते गजापुरात संचारबंदी लागू असताना गेले. खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांचा स्वभाव सरळसाधा आहे. त्यांची ढाल करून काहीजण राजकीय पोळ्या भाजण्याचे काम करत आहेत.’

प्रशासनाचे भिजत घोंगडे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्यायालयात नसणारी अतिक्रमणे काढण्याचा निर्णय घेतला. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. आजपर्यंत प्रशासनाने हे भिजत घोंगडे ठेवले होते.

सखोल चौकशी व्हावी

गजापुरात जी चुकीची घटना घडली ती शिवभक्तांकडून होणार नाही. यामध्ये एक प्रकारचा पॅटर्न दिसतो. त्यामुळे तोडफोड करणारे नेमके कोण होते, ते कोठून आले या सर्वांची सखोल चौकशी करावी. काही नेत्यांनी दंगल होईल, असे भाकीत केले होते. त्यांच्या विधानाचीही चौकशी करावी, असे खासदार माने म्हणाले.

संभाजीराजे यांची भूमिका योग्य

संभाजीराजे छत्रपती यांनी आजवर जी आंदोलने केली ती संयमित आणि सनदशीर मार्गाने केली. विशाळगडावरील अतिक्रमणाबाबत त्यांची भूमिका आक्रमक असली, तरी त्यांनी हिंसाचाराची भाषा कधीच केली नाही. ते तेथे जाण्यापूर्वीच तोडफोड झाली होती. त्यांची भूमिका योग्यच आहे, असेही माने यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cheteshwar Pujara Retire: भारताचा 'टेस्ट स्पेशालिस्ट' निवृत्त! पुजाराने केली मोठी घोषणा; म्हणाला, 'प्रत्येक चांगली गोष्ट...'

Latest Marathi News Updates : सांगोला तालुक्यात लांडग्यांचा कहर!

'जर कोणी माझ्यासाठी या दोन गोष्टी केल्या, तर मी आयुष्यात कधीच दक्षिणा घेणार नाही'; बागेश्वर बाबांचे मोठे विधान

Viral Video : महिलेने वाचविलेला जीव, अनेक वर्षांनी दिसताच सिंहांनी मारली मिठी, हृदयस्पर्शी व्हिडिओ पाहून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी

Thalapathy Vijay चा मेगा ब्लॉकबस्टर शो! Modi च्या सभेपेक्षा जास्त गर्दी, पडद्यावरून थेट मैदानात कसा आला?

SCROLL FOR NEXT